Beauty Secrets : सुंदरता वाढवण्यासाठी बॉलिवूडची कुठली अभिनेत्री केसांना बिअर लावते? कोण चेहऱ्याला तूप लावतं?
Bollywood Actresses Beauty Secrets: बॉलिवूड अभिनेत्रींची सुंदर त्वचा आणि चमकदार केस नेहमीच चर्चेचा विषय असतात. यासाठी त्या महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्ससोबतच काही पारंपरिक घरगुती उपायांचाही वापर करतात. चेहऱ्यावर तूप लावण्यापासून केस धुण्यासाठी बिअरचा वापर करण्यापर्यंत, जाणून घ्या अभिनेत्रींचे खास देसी ब्युटी सीक्रेट्स.

बॉलिवूड अभिनेत्री आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर आणि हेअर केअर प्रॉडक्ट्सचा वापर करतात. मात्र, अनेक अभिनेत्री महागड्या प्रॉडक्ट्स सोबतच आजीच्या काळापासून चालत आलेल्या घरगुती उपायांवरही विश्वास ठेवतात. तूप, बर्फ, बेसन, हळद आणि नारळाच्या तेलासारख्या नैसर्गिक घटकांचा त्या आपल्या ब्युटी रुटीनमध्ये समावेश करतात. जाणून घेऊया, कोणती अभिनेत्री त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी कोणते देसी उपाय वापरते.
जान्हवी कपूर केसांची काळजी घेण्यासाठी अंडी, बिअर आणि मेथी यांसारख्या घरगुती घटकांचा वापर करते. अंड्यामुळे केसांना चमक मिळण्यास मदत होऊ शकते, तर बिअरचा वापर केस मऊ आणि चमकदार दिसण्यासाठी केला जातो. मेथीचा पॅक केसांना आतून पोषण देण्यास मदत करतो.
आलिया भट्टचे आइस वॉटर रुटीन
आलिया भट्टच्या स्किन केअर रुटीनमध्ये बर्फाच्या पाण्याचा समावेश आहे. ती संध्याकाळी बर्फाच्या पाण्याने भरलेल्या भांड्यात काही २-३ सेकंद चेहरा बुडवते. असे ती साधारण ५ मिनिट करे. यामुळे चेहऱ्यावरील थकवा कमी होत असल्याचे ती सांगते.
करिश्मा कपूर लावते तूप
करिश्मा कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची आजी चेहऱ्यावर तूप लावत असे आणि तिच्याकडूनच तिने ही सवय शिकली. तुपातील स्निग्ध घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
प्रियांका चोप्राचे घरगुती फेस पॅक
प्रियांका चोप्रा त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन, दही आणि हळद यांपासून तयार केलेल्या उटण्याचा वापर करते. यामुळे त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत होते, असे ती सांगते.
दीपिका पदुकोण करते तेल मसाज
दीपिका पदुकोण केसांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा कोमट नारळाच्या तेलाने केसांना मसाज करते. या उपायामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास आणि केसांना चमक मिळण्यास मदत होऊ शकते.
श्रद्धा कपूरचे अॅलोव्हेरा जेल
श्रद्धा कपूर चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अॅलोव्हेरा जेलचा वापर करते. यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.
कतरिना कैफचा ओट्स फेस पॅक
कतरिना कैफ त्वचेची काळजी घेण्यासाठी ओट्स, साधे दही आणि मध यांचा फेस पॅक वापरते. या मिश्रणामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि डेड स्किन सेल्स काढण्यास मदत होऊ शकते. तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासही मदत होऊ शकते.
टीप – बॉलिवूड अभिनेत्री तज्ज्ञांचा सल्ला आणि स्वतःच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन या घरगुती उपायांचा वापर करतात. जर तुम्ही यापैकी कोणताही उपाय करून पाहणार असाल तर आधी पॅच टेस्ट नक्की करा.