Khushbu Sundar : वयाच्या 56 व्या वर्षीही खुशबू सुंदर यांच्या त्वचेवर इतका जबरदस्त ग्लो कसा? ‘या’ 3 नैसर्गिक गोष्टींमध्ये दडलय त्यांच्या सौंदर्याचं रहस्य

Khushbu Sundar : वयाच्या ५६ व्या वर्षीही अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्या त्वचेवरील नैसर्गिक चमक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या ग्लोइंग स्किनमागचं रहस्य त्यांनी सांगितलं आहे.

Khushbu Sundar : वयाच्या 56 व्या वर्षीही खुशबू सुंदर यांच्या त्वचेवर इतका जबरदस्त ग्लो कसा? या 3 नैसर्गिक गोष्टींमध्ये दडलय त्यांच्या सौंदर्याचं रहस्य
khushbu sundar
| Edited By: | Updated on: Oct 12, 2026 | 1:20 PM

वाढत्या वयातही त्वचेवरील नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी अनेक जण महागड्या ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. मात्र अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर यांनी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही साध्या गोष्टींना पसंती दिली आहे. वयाच्या ५६ व्या वर्षीही त्यांच्या ग्लोइंग स्किनची चर्चा होत आहे. खुशबू सुंदर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य सांगितले. त्या म्हणाल्या, “मला सकाळी लवकर उठण्याची सवय आहे. मी पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान उठते. सकाळी घरातील सर्वांसाठी चहा बनवते. त्यामुळे मी चेहऱ्यावर कच्चं दूध लावते. कधी कधी केशरच्या काड्या पाण्यात भिजवून ते पाणी चेहऱ्यावर लावते. तर कधी माझ्या मूडनुसार खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज करते. मी दररोज साधारण अर्धा तास हे करते.”

खुशबू सुंदर यांच्या स्किन केअर रुटीनमध्ये महागडे ब्युटी प्रोडक्ट किंवा ट्रीटमेंटचा समावेश नाही तर त्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक गोष्टी वापरतात. त्या त्यांच्या ग्लोइंग त्वचेचे श्रेय कच्चं दूध, केशर आणि नारळाच्या तेलाला देतात. त्या कधी खोबरेल तेल तर कधी बदामाचे तेल वापरतात. विशेष म्हणजे त्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी दररोज साधारण अर्धा तास देतात. केवळ नैसर्गिक गोष्टी वापरून उपयोग नाही तर त्यात सातत्य आणि रोज काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Loading...

सतत काहीतरी खाण्याची सवय टाळा

त्वचेच्या निगेसोबतच खुशबू सुंदर यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचीही चर्चा होत आहे. त्यांनी सुमारे ४० किलो वजन कमी केलं आहे. यासाठी त्यांनी खाण्याच्या सवयींमध्ये बदल केले. त्यांच्या मते, वजन कमी करताना केवळ डाएट करण्यापेक्षा दीर्घकाळ पाळता येतील अशा सवयी विकसित करणं महत्त्वाचं आहे. दर दोन-तीन तासांनी काहीतरी खात राहण्याऐवजी खरोखर भूक लागल्यावर खाण्यावर त्या भर देतात. सतत काहीतरी खाण्याची सवय टाळणं आणि अन्नाच्या प्रमाणाकडे लक्ष देणं त्यांच्या रूटीनचा भाग आहे.

जपानी पद्धतीचाही अवलंब

खुशबू सुंदर यांनी खाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी जपानी पद्धतीचाही अवलंब केला. त्या मोठ्या ताटाऐवजी लहान प्लेटमध्ये जेवण घेतात. त्यांच्या मते, लहान प्लेट वापरल्याने अन्नाचं प्रमाण मर्यादित ठेवण्यास मदत होते. त्यांच्या स्किन केअर आणि वेट लॉस जर्नीमधून नियमित दिनचर्या आणि सवयींमधील बदलांचं महत्त्व दिसून येतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us