बजाज पल्सर 150 क्लासिक आता नव्या रुपात

नवी दिल्ली : भारतात बजाजच्या बाईक लोकप्रिय आहेत. त्यामुळे कंपनीकडून नेहमीच नवनवीन प्रकारच्या बाईक बाजारात लाँच केल्या जातात. बजाजच्या बाईक लोकांना पसंतही पडतात आणि त्या त्यांच्या खिशाला परवडणाऱ्याही असतात. आता कंपनीने अशीच एक नवी बाईक बजाज पल्सर 150 क्लासिक लाँच केली आहे. याआधी काळ्या रंगात असलेल्या बजाज पल्सर 150 क्लासिकमध्ये आता दोन नवे रंग आले …

बजाज पल्सर 150 क्लासिक आता नव्या रुपात

नवी दिल्ली : भारतात बजाजच्या बाईक लोकप्रिय आहेत. त्यामुळे कंपनीकडून नेहमीच नवनवीन प्रकारच्या बाईक बाजारात लाँच केल्या जातात. बजाजच्या बाईक लोकांना पसंतही पडतात आणि त्या त्यांच्या खिशाला परवडणाऱ्याही असतात. आता कंपनीने अशीच एक नवी बाईक बजाज पल्सर 150 क्लासिक लाँच केली आहे. याआधी काळ्या रंगात असलेल्या बजाज पल्सर 150 क्लासिकमध्ये आता दोन नवे रंग आले आहेत. लाल आणि चंदेरी या दोन नव्या रंगाने हायलाईट्स केलेली ही बाईक नव्या रुपात आपल्या समोर येत आहे.

कंपनीने नवीन रंगात आणलेल्या पल्सरच्या किमतीत बदल केलेला नाही. ही बाईक सध्या दिल्लीमध्ये उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये या बाईकच्या एक्स शोरुमची किंमत 64,998 रुपये आहे.

बजाज पल्सर 150 क्लासिकला जून 2018 मध्ये लाँच करण्यात आले, पण बाजारात ती नुकतीच उपलब्ध झाली आहे. नवीन बाईकमध्ये हेडलाईट क्लस्टर, ग्रॅब हँडल, रिम टेप आणि साईड पॅनलवर लाल आणि चंदेरी रंगाने हायलाईट्स केलेले आहे. यामुळे बाईकचा नवीन लूक अधिक आकर्षक वाटतो.

बजाजच्या वेबसाईटवर अद्यापही या नवीन गाडीचे फोटो उपलब्ध नसले तरी शहरातील बऱ्याच शो-रुममध्ये या बाईक विक्रीस आल्या आहेत. सोशल मीडियावर लीक झालेल्या फोटोमुळे ही माहिती समोर आली.

नवीन रंगाच्या पल्सरमध्ये फारसा काही बदल करण्यात आलेला नाही. त्यात 149सीसी इंजिन, एअर कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8000rpm वर14PS पॉवर आणि 6000rpm वर 13.4Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5 गिअर असून, ब्रेकिंगसाठी यामध्ये 240 एमएम फ्रंट डिस्क आणि 130एमएम रिअर ड्रम ब्रेक दिलेला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *