अंघोळ करताना पाण्यात ही एक गोष्टी मिसळा, हळूहळू आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे बरेच फायदे आहेत. शारीरिक तसेच अध्यात्मानुसार अंघोळीच्या पाण्यात फक्त ही एक गोष्ट मिसळा आणि मग चमत्कार पाहा. या पाण्याने अंघोळ करणे म्हणजे स्वत:ला शुद्ध करण्यासारखे आहे. चला तर मग जाणून घेऊयात की ती कोणती गोष्ट आहे जी मिसळून अंघोळ केल्याने सकारात्मक फायदे मिळतात ते.

अंघोळ करताना पाण्यात ही एक गोष्टी मिसळा, हळूहळू आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल
Bathing in salt water
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2025 | 12:32 PM

आजच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव, थकवा आणि अंगदुखी सारख्या समस्या तर असतातच पण सोबतच नकारात्मकता, अतिविचार, चिंता या सर्व गोष्टी देखील त्याला लागूच आयुष्यात येतात. त्यासाठी तसे बरेच उपाय आहे पण एक उपाय असा आहे जो कोणाही अगदी सहज करू शकते. हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो.

मिठाचा संबंध कायम सकारात्मक आणि नकारात्मत उर्जेशी लावला जातो.

यासाठी तुम्हाला अंघोळ करताना फक्त एक गोष्ट पाण्यात मिसळण्याची आवश्यकता आहे. ती गोष्ट म्हणजे समुद्री मीठ, किंवा पिंक सॉल्ट. होय मीठ, जीवनात संतुलन राखण्याचे घटक देखील मानले जाते. अन्नाला चवदार बनवण्याव्यतिरिक्त, ते सकारात्मकता आणि संतुलनाचे प्रतीक देखील मानले जाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात मिठाचे फार महत्त्व सांगण्यात आले आहे. मिठाचा संबंध कायम सकारात्मक आणि नकारात्मत उर्जेशी लावला जातो.

मिठाचे पाणी केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठी देखील चांगले आहे. कोमट मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने ताण कमी होतो आणि चांगली झोप येते. झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर आहे.

हा उपाय कसा करावा.

अंघोळीच्या गरम पाण्याच्या टब किंवा बादलीमध्ये छोटी वाटी मीठ टाका. कडक पाणी असल्याने मीठ विरघळायला फार वेळ लागणार नाही. ते लगेच विरघळू लागेल. नंतर त्या मीठाच्या गरम पाण्याने अंघोळ करा. ही पद्धत लवकर काम करते. तथापि, जर तुमच्या त्वचेवर उघड्या जखमा किंवा संसर्ग असतील किंवा तुम्हाला मिठाची अ‍ॅलर्जी असेल तर मीठाने आंघोळ करणे टाळा. कारण त्यामुळे त्या जखमांची जळजळ होऊ शकते.

मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे शारीरिक फायदे

स्नायूंच्या वेदनांपासून आराम: दिवसभर काम केल्याने, विशेषतः 8 ते 9 तास बसून काम केल्याने, शरीर कडक होणे आणि स्नायू दुखणे वाढू शकते. वेदनाशामक औषधांऐवजी, मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे हे वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे रक्ताभिसरण वाढते, स्नायू दुखणे कमी होते आणि विशेषतः थकलेल्या पायांना आराम मिळतोताण कमी करण्यास मदत करा

झोप चांगली लागते : मिठाचे पाणी केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठी देखील चांगले आहे. कोमट मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने ताण कमी होतो आणि चांगली झोप येते. झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे विशेषतः फायदेशीर आहे. त्यामुळे झोपही चांगली लागते.

शास्त्रानुसार मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे 

नकारात्मक ऊर्जा काढून टाकते : मिठात नैसर्गिक शुद्धीकरण गुणधर्म असतात जे शरीराच्या तेजोमंडलातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतात.

मानसिक शांती वाढते : आठवड्यातून एक किंवा दोनदा मीठ पाण्याने आंघोळ केल्याने ताण आणि दुःख कमी होऊ शकते.

आभा / ऑरा सकारात्मक होतो : मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता देखील येते. तसेच आपला ऑरा देखील स्ट्राँग होतो तसेच नकारात्मकता देखील दूर होते.

समुद्री मीठ म्हणजे काय?

समुद्री मीठ ज्याला काहीजण जाडे मीठ असेही म्हणतात. ते नेहमीच्या मिठापेक्षा नक्कीच जाडसर असते. त्यात नियमित टेबल मीठापेक्षा मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि जस्त सारखी खनिजे जास्त असतात. ही खनिजे आपल्या त्वचेसाठी, स्नायूंसाठी आणि सांध्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.

 

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)