महिलांच्या वार्डरोबमध्ये ‘या’ ब्रा नक्की असाव्यात… तुमच्या वार्डरोबमध्ये आहेत का?

नोकरीसाठी बाहेर पडलेली महिला आज या स्पर्धेच्या जगात मोठ्या आत्मविश्वासानं वावरतेय. तिचा पेहराव बदललाय. आज ती तिच्या लूक विषयी खूप जागृत झालीय. पण जर तुम्ही एखाद्या ड्रेसखाली योग्य ब्रा (Bra) वापरली नाही तर तुमचा लूक बिघडतो आणि त्यातून तुमचा आत्मविश्वास ढासळतो.

महिलांच्या वार्डरोबमध्ये 'या' ब्रा नक्की असाव्यात... तुमच्या वार्डरोबमध्ये आहेत का?
ब्रा
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 1:08 PM

तुमच्यासोबत कधी असं झालं आहे, की तुम्ही एखादा ड्रेस घातला आणि योग्य ब्रा (Bra) नसल्यामुळे तुमचा लूक खराब दिसतोय. कुठली ब्रा कुठल्या ड्रेससोबत घ्यायला पाहिजे याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर महिलांनी आपल्या वार्डरोबमध्ये कायम या 5 ब्रा ठेवल्या पाहिजे.

या 5 ब्रा वार्डरोबमध्ये ठेवा 1. टीशर्ट ब्रा – ही ब्रा प्रत्येक महिलेच्या वार्डरोबमध्ये असते किंवा असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही टीशर्ट घालता तेव्हा तुम्ही ही ब्रा वापरल्यास एक क्लीन लूक मिळतो. ही ब्रा रोजच्या वापरासाठीही फायदेशीर आहे. ही ब्रा कॉटनची घेणं योग्य आहे. 2. बॅकलेस ब्रा – ही ब्रादेखील प्रत्येक महिलांकडे असायला हवी. आजकाल महिला गाऊन घालतात. अनेक महिलांचे ड्रेस किंवा ब्लाऊजचा मागून गळा डीप असतो. अशावेळी बॅकलेस ब्रा खूप महत्त्वाची असते. या ब्राचा दुहेरी फायदा आहे या ब्राचे स्ट्रेप्सही काढून टाकता येतात. 3. स्ट्रीप्सलेस ब्रा – अनेक महिला ऑफ शोल्डर टॉप घालतात मग अशावेळी ब्राची स्ट्रीप्स दिसल्याने त्यांचा लूक खराब दिसतो. तेव्हा अशी वेळी स्ट्रीप्सलेस ब्रा घालणं उपयोगी पडतं. ही ब्रा घेताना काळजीपूर्वक घ्यावी. ती घालून पाहिल्याशिवाय दुकानातून खरेदी करु नये. 4. कन्व्हर्टेबल ब्रा – ही ब्रा प्रत्येक महिलेच्या वार्डरोबमध्ये नक्की असावी. ही ब्रा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे घालू शकता. या ब्राची स्ट्रीप्स तुम्ही अडजस्ट करू शकता. या ब्राची एक खासियत म्हणजे, ही वेगवेगळ्या ड्रेससोबत तुम्ही घालू शकतात. 5. स्पोर्ट्स ब्रा – आज महिला आपल्या आरोग्याविषयी खूप जागृत आहेत. त्यासाठी महिला जीमला जातात, योगा, व्यायाम करतात. मग अशावेळी तुमच्या वार्डरोबमध्ये स्पोर्ट्स ब्रा असणे गरजेचं आहे. व्यायाम करताना ही ब्रा तुमच्या स्तनांना चांगला सपोर्ट देते. त्यामुळे याचा तुम्हाला फायदा होतो.

त्याशिवाय ब्राचा अजून प्रकार आहे तो म्हणजे टीनएजर ब्रा ही खास टीनएजरसाठी ब्रा बनवली आहे. या ब्राचं वैशिष्ट्य म्हणजे ही अतिशय लाईटवेट असते आणि या ब्राला हुकदेखील नसतो. त्यामुळे ही टीनएजरसाठी अतिशय फायदेशीर आणि कम्फर्टेबल असते. म्हणून टीनएजरने या ब्राचा उपयोग नक्की करावा.

Strawberry Face Pack : ग्लोइंग त्वचा आणि पिंपल्स दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी फेसपॅक अत्यंत फायदेशीर!

तिशितलं वृद्धत्व: उच्च रक्तदाब ते केसगळती; ‘या’ गोष्टी तुम्ही समजून घ्यायलाच हव्यात!

Relationship : वैवाहिक जीवनात तणाव वाढलाय? मग शुक्र ग्रहाला कसं करणार खुश? जाणून घ्या एका क्लिकवर…

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.