AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips | मजबूत आणि घनदाट केस हवेत, तर आजच ‘हा’ उपाय ट्राय करा!

भारतातील प्रत्येक घरांच्या स्वयंपाकघरात मोहरीचे तेल सहज उपलब्ध होते. मोहरीचे तेल नैसर्गिकरित्या जाडसर असते आणि तीक्ष्ण गंधाने अन्नाला चांगली चव देते.

Hair Care Tips |  मजबूत आणि घनदाट केस हवेत, तर आजच 'हा' उपाय ट्राय करा!
मुलतानी माती हे केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर मानले जाते. हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती पावडर घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून जाड पेस्ट बनवा. आता हा पॅक आपल्या केसांमध्ये लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 16, 2021 | 10:09 AM
Share

मुंबई : भारतातील प्रत्येक घरांच्या स्वयंपाकघरात मोहरीचे तेल सहज उपलब्ध होते. मोहरीचे तेल नैसर्गिकरित्या जाडसर असते आणि तीक्ष्ण गंधाने अन्नाला चांगली चव देते. याचा वापर बहुतेकवेळा स्वयंपाक घरात अन्न शिजवण्यासाठी केला जातो. मात्र,  हे तेल केवळ खाण्यासाठीच नाही तर, मोहरीचे तेल त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील उपयोगी आहे. पण, तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत काय? चला तर, आज आम्ही तुम्हाला मोहरीच्या तेलाचे केसांना होणारे फायदे सांगणार आहोत. (Mustard oil is beneficial for hair)

मोहरीच्या तेलाचा असा करा उपयोग :

रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यामध्ये मोहरीचे तेल घ्या आणि त्यामध्ये मेथीचे दाणे भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाच ते सात मिनिटांसाठी गॅसच्या मध्यम आचेवर हे तेल गरम करा. मेथीच्या बियांचा रंग काळा झाल्यास गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. मोहरीच्या तेलामुळे केसांशी संबंधित कित्येक समस्या दूर होण्यास मदत मिळते. आजही कित्येक जणी हेअर केअर रुटीनमध्ये मोहरीच्या तेलाचा समावेश करतात. कारण हा उपाय प्रभावी व पूर्णतः नैसर्गिक आहे.

तेल जरासे कोमट झाले की, केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावा. मुळांसह संपूर्ण केसांना तेल लावा आणि हलक्या हाताने केसांचा मसाज करावा. यानंतर कंगवा करा आणि केस बांधा. यानंतर तासाभरानंतर हर्बल शॅम्पूने आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय नियमित केल्यास केस मजबूत, घनदाट आणि जाड होण्यास मदत मिळेल (Mustard oil is beneficial for hair).

मोहरीचे तेल ठरेल गुणकारी!

हवे असल्यास आपण रात्रभर देखील केसांमध्ये तेल लावून ठेवू शकता. आठवड्यातून तिनदा हा उपाय करावा. काही लोकांचे केस मुळातच पातळ असतात. तर, योग्य देखभाल न केल्याने काही जणांचे केस पातळ होतात. केसांना आतील व बाहेरील बाजूनेही पोषण तत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी मोहरीचे तेल गुणकारी ठरते. केस वाढीसाठी केवळ आयुर्वेदिक तेलांचा वापर करण्यापेक्षा आपल्या आहारामध्ये आवळा, बीट, डाळिंब आणि अक्रोड यासारख्या पौष्टिक पदार्थांचाही समावेश करावा.

(Mustard oil is beneficial for hair)

हेही वाचा :

केळीच्या सालाचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा…

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? तर मग ‘हे’ खाणे टाळाच

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...