AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teeth Whitening  | दातांचा पिवळेपणा 2 मिनिटात दूर करण्यासाठी भन्नाट टिप्स!

दात हा आपल्या शरीराचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मात्र, अनेकदा स्वच्छ्तेच्या बाबतीत दुर्लक्षित राहणारा हा अवयव आहे.

Teeth Whitening  | दातांचा पिवळेपणा 2 मिनिटात दूर करण्यासाठी भन्नाट टिप्स!
दात
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 04, 2021 | 3:17 PM
Share

मुंबई : दात हा आपल्या शरीराचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मात्र, अनेकदा स्वच्छ्तेच्या बाबतीत दुर्लक्षित राहणारा हा अवयव आहे. शारीरिक अस्वच्छतेमुळे किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होऊ दात पिवळे होऊ शकतात. काहींमध्ये धुम्रपानाच्या अतिसेवनामुळे, तर काहींमध्ये चहा-कॉफी-शीतपेये अतिप्रमाणात सेवन केल्यानेदेखील दात पिवळे होऊ शकतात (Teeth Whitening  home remedies use these things to clean your teeth).

दात पिवळे असतील तर तुम्हालाही चारचौघात हसायला अगदी नकोसे होऊन जाते. हा दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी आपण डेंटीस्टकडे जातो  किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्स आणि पेस्टचा आधार घेतो. मात्र, यातील रसायनांनमुळे आपल्या दातांची हानी देखील होऊ शकते. अशावेळी दातांचा हा पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील ट्राय करू शकता…

2 मिनिटात दूर होईल दातांचा पिवळेपणा!

केळ्याची साल

केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. हे घटक ब्लिचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. म्हणून केळी खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता, ती साल आपण आपल्या दातांवर घासू शकता. आठवड्यातून किमान 2 वेळा हा उपाय केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

बेकिंग सोडा आणि लिंबू

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. यामुळे केवळ काही मिनिटांतच आपले दात मोत्यासारखे चमकदार होतील.

कडूलिंब

दातांच्या कोणत्याही समस्येवर कडूलिंब हा सर्वोत्तम उपाय आहे. कडूलिंबमुळे दातांमधील किड, दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते. कडूलिंबाचा पाला सुकवून त्याची पावडर करून त्याने दात घासा. हल्ली बाजारात तयार पूड देखील मिळते. याच्या नियमित वापराने दात पांढरे होतात.

कोळसा

बऱ्याचदा आपण टीव्हीवर किंवा इतर जाहिरातीत चारकोलच्या गुणांबद्दल ऐकले असेलच! चारकोल अर्थात कोळसा देखील दातांचा पिवळेपण दूर करण्यात फायदेशीर ठरतो. यासाठी बाजारात मिळणारी अॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर घेऊन त्यानी दात स्वच्छ करू शकता. त्यामुळे तुमचे दात पांढरे दिसू लागतील (Teeth Whitening  home remedies use these things to clean your teeth).

दातांवर डाग पडणाऱ्या ‘या’ पदार्थांपासून दूर राहा!

आपले दात चमकदार असावेत असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, कधीकधी आपण असे काही खातो, ज्यामुळे आपल्या दातांवर डाग पडतात आणि दात खराब दिसू लागतात. त्यामुळे शक्यतो या पदार्थांपासून दूर राहणेच अधिक फायदेशीर ठरते. यातील पहिला पदार्थ म्हणजे चहा. चहा पिणे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडते. पण, दातांसाठी चहा चांगला मानला जात नाही. दातांचे बाह्य आवरण अर्थात इनेमलसाठी चहा अतिशय नुकसानदायी ठरतो. ज्यामुळे दात कमकुवत होतात आणि पिवळे पडतात. याशिवाय सोडा, कोला आणि इतर मद्य दातासाठी हानीकारक आहेत. या कार्बोनेटेड पेयांमधील रसायनांमुळे दातांचा बाह्य थर खराब होतो. आणि यामुळे दात पिवळे पडून कमकुवत होतात. कँडीज, सॉस, बेरीज या पदार्थांच्या सेवनाने देखील दातांवर डाग पडतात. तेव्हा, जर आपल्याला पांढरेशुभ्र दात हवे असतील, तर या पदार्थांपासून दूर राहिलेलेच चांगले!

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Teeth Whitening  home remedies use these things to clean your teeth)

हेही वाचा :

Skin Care | शिजवलेल्या तांदळापासून मिळेल चमकदार त्वचा, नक्की ट्राय करा ‘राईस’ फेसपॅक!

Weight Loss | डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात