कापूराचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत? वाचा…

| Updated on: Mar 04, 2021 | 9:35 AM

प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. परंतु, सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही

कापूराचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत? वाचा...
Follow us on

मुंबई : प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. परंतु, सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही, तर यासाठी त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसणे देखील महत्वाचे आहे. जर, त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. चला तर, त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स जाणून घेऊया…(You know these benefits of camphor)

-बऱ्याचे लोकांना शरीरावर सतत खाज सुटते यामुळे अनेक जण त्रस्त असतात अशा लोकांनी कापूराचे तेल लावावे. कापुराचे तेल लावल्यानंतर खाज सुटणे बंद होईल.

– जर तुमच्या चेहऱ्यावर सतत मुरूमाची फोडे येत असतील तर तुम्ही टी ट्री ऑइल आणि कापूर तेलाचे एकत्र मिश्रण करा आणि चेहऱ्यावर ज्याभागी मरूम येत आहे त्याठिकाणी लावा.

-तुम्हाला जर सतत खोकला येत असेल तर बदामाच्या तेलात 6-7 थेंब कापूराचे तेल मिक्स करुन या तेलाने छातीची मालिश केली पाहिजे.

-तुम्हाला जर चेहऱ्यावर सूज आणि येण्याची समस्या असेल तर तुम्ही चेहऱ्याला कापुर लावा ती समस्या तुमची नक्की दूर होईल. काही लोकांची त्वचा जळजळ होते अशी समस्या नेहमीच असते यापासून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही चेहऱ्याला कापुर लावा.

-जर तुम्हाला कफचा खूप त्रास होत असेल तर कापूर तेलाचे 3 ते 4 थेंब गरम पाण्यात टाकून त्या पाण्याची वाफ घेतल्यास छातीतील कफ मोकळा होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

OMG: जगातील सर्वात महाग बिर्याणी! एक प्लेटसाठी तब्बल 20 हजार रुपये मोजावे लागणार…

Caviar Expensive food | जगातील सर्वात महागडा पदार्थ ‘कॅविअर’, वाचा याचे फायदे…

Fennel Benefits | निरोगी शरीरासाठी दुधाबरोबर करा ‘बडीशेप’चे सेवन!

(You know these benefits of camphor)