OMG: जगातील सर्वात महाग बिर्याणी! एक प्लेटसाठी तब्बल 20 हजार रुपये मोजावे लागणार…

दुबईमध्ये एका रेस्टॉरंटने जगातील सर्वात 'महाग' बिर्याणी लॉन्च केली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:33 AM, 2 Feb 2021
OMG: जगातील सर्वात महाग बिर्याणी! एक प्लेटसाठी तब्बल 20 हजार रुपये मोजावे लागणार...
Expensive biryani

नवी दिल्ली : जगात खवय्यांची काही कमी नाही. कारण, शौक बडी चीज है. लोक आपले खाण्याचे (Worlds Most Expensive Gold Biryani) शौक पूर्ण करण्यासाठी काहीही करतात. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. त्यातच जर बिर्याणी सारखा पदार्थ असेल, तर त्याचं फक्त नावच ऐकता तोंडाला पाणी सुटतं. पण, जर कधी तुम्हाला हे विचारलं की तुम्ही 20 हजार रुपयांची बिर्याणी खाल्ली आहे? तर तुमच्यापैकी अनेकजणांचं उत्तर नाही असेल (Worlds Most Expensive Gold Biryani).

इतकंच नाही तर तुमच्या मनात हा प्रश्न देखील उपस्थित होईल की काय खरंच 20 हजार रुपयांची बिर्याणी मिळते? तर हे काही स्वप्न नाही, खरंच 20 हजार रुपयांची बिर्याणी असते. चला जाणून घेऊ या स्पेशल बिर्याणीची कहाणी….

कुठे मिळते ही सर्वात महाग बिर्याणी?

रिपोर्टनुसार, दुबईमध्ये एका रेस्टॉरंटने जगातील सर्वात ‘महाग’ बिर्याणी लॉन्च केली होती. Bombay Borough नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या या बिर्याणीची किंमत 20 हजार रुपये आहे. इथे 20 हजार रुपयांना एक प्लेट बिर्याणी मिळते (Worlds Most Expensive Gold Biryani).

या रेस्टोरंटच्या मालकाने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला या बिर्याणीला मेन्यूमध्ये लॉन्च केलं. ही एक प्लेट बिर्याणी एका वेळी सहा जण खाऊ शकतात. रॉयल बिर्याणीला 23 कॅरेट सोन्याने सजवण्यात आलं आहे.

45 मिनिटांत तुमच्या टेबलवर

मिळालेल्या माहितीनुसार, या बिर्याणीमध्ये काश्मिरी मटण कबाब, पुरानी दिल्ली मटन चॉप्स, राजपूत चिकनचे कबाब, मुघलई कोफ्ते आणि मलाई चिकन यांचा समावेश आहे. ऑर्डर केल्याच्या 45 मिनिटांनंतर ही बिर्याणी तुमच्या टेबलवर असेल. या बिर्याणीसोबत रायता, करी आणि सॉसही सर्व्ह केलं जाईल. त्यामुळे तुम्ही जेव्हाही दुबईला जाल ही बिर्याणी नक्की ट्राय करा.

Worlds Most Expensive Gold Biryani

संबंधित बातम्या :

‘दही’ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Health Tips | शिळे अन्न खाताय? सावधान! ‘या’ गंभीर समस्यांचा करावा लागू शकतो सामना…

Strawberry Benefits | हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या त्यांच्याविषयी…