Caviar Expensive food | जगातील सर्वात महागडा पदार्थ ‘कॅविअर’, वाचा याचे फायदे…

Caviar Expensive food | जगातील सर्वात महागडा पदार्थ ‘कॅविअर’, वाचा याचे फायदे...
‘कॅविअर’ला श्रीमंतांचा आवडता पदार्थ असे म्हटले जाते

सगळ्यात महाग असणाऱ्या ‘कॅविअर’ला ‘अनफर्टीलाइज्ड सॉल्ट एग’ म्हणतात. ही माशांच्या अंडी आहेत, जी माशांच्या एका विशिष्ट प्रजातीकडून प्राप्त केली जातात.

Harshada Bhirvandekar

|

Feb 01, 2021 | 3:31 PM

मुंबई : ‘कॅविअर’ला श्रीमंतांचा आवडता पदार्थ असे म्हटले जाते आणि त्यामागे बरीच कारणे आहेत. हे केवळ दिसायलाच सुंदर नाही तर, त्याचा रेशमी पोत, माशांची चव आणि मोत्यांसारखा दिसणारा हा पदार्थ पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटते. परंतु, आपणास हे माहित आहे का की, कधीकाळी ‘कॅविअर’का गरिबाचे खाद्य असे म्हटले जायचे. फार पूर्वी एक रशियन मच्छीमार त्याच्या नियमित आहाराचा एक भाग म्हणून बटाट्यामध्ये मिसळून ‘कॅविअर’ हा पदार्थ खायचा (Expensive food Caviar benefits).

या पदार्थाला ‘रो’ नावानेही ओळखले जाते, जे त्याला रशियन मच्छीमारांनी दिले होते. चला तर जाणून घेऊया कॅविअर म्हणजे काय? याला खूप महागडा पदार्थ का म्हटले जाते आणि तो कसा खावा?, तो खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी किती फायदा होतो? आणि अशा अनेक प्रश्नांनी उत्तरं…

काय आहे ‘कॅविअर’?

सगळ्यात महाग असणाऱ्या ‘कॅविअर’ला ‘अनफर्टीलाइज्ड सॉल्ट एग’ म्हणतात. ही माशांच्या अंडी आहेत, जी माशांच्या एका विशिष्ट प्रजातीकडून प्राप्त केली जातात. मुख्यतः काळ्या, ऑलिव्ह ग्रीन आणि केशरी रंगात ‘कॅविअर’ आढळते. स्टर्जिन माशातून ‘कॅविअर’ हा पदार्थ मिळतो. स्टर्जिन माशाच्या 26 वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. यातील नर मासे केवळ केविअर मिळवण्यासाठीच वापरतात. हे स्टर्जिन मासे तब्बल 100 वर्षांपेक्षा जास्त वयापर्यंत जगू शकतात.

का आहे इतके महाग?

बाजारात कॅविअरचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यांची किंमत त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. आपल्याला 8000 ते 18000 रुपयांदरम्यान केवळ 30 ग्रॅम कॅविअर मिळू शकेल. बेलूगा कॅविअर सर्वात महाग आहे आणि त्याची किंमत याहूनही जास्त आहे. तथापि, स्टर्जिन माशाची जास्त असताना देखील, कॅविअर इतके महाग आहे. कारण, मादी मासे कमीतकमी 10 ते 15 वर्षे अंडी ठेवतात. सुरुवातीला माशांना मारून अंडी बाहेर काढली जात होती. परंतु, आता प्रगत तंत्रज्ञानामुळे माशांना न मारता अनुकूल पद्धतीने अंडी बाहेर काढली जातात (Expensive food Caviar benefits).

कसे खावे कॅविअर?

आपण टोस्ट आणि बिस्किटांसह कॅविअर खाऊ शकता. याशिवाय फ्रेश क्रीम, चिरलेली कांदे आणि हर्ब्स वनस्पतींनी त्याला गार्निश करू शकता. आपण इच्छित असल्यास, उकडलेल्या अंड्यांसह देखील ते खाऊ शकता. मात्र, हे लक्षात ठेवावे की कॅविअर कधीही रूम टेम्प्रेचरवर ठेवू नये. ते नेहमी फ्रिजमध्ये ठेवा.

फायदे :

ओमेगा-3 फॅटी अॅसिड

यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंधित करतात. जे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते.

व्हिटामिन बी 12

या कॅविअरमध्ये व्हिटॅमिन बी 12ची चांगली मात्रा आहे. ते लाल पेशी बनवण्याचे काम करतात. शरीरात व्हिटामिन बी-12च्या कमतरतेमुळे थकवा, नैराश्य आणि अशक्तपणाची समस्या उद्भवते.

(Expensive food Caviar benefits)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें