Vladimir Putin : या चार छोट्या गोष्टींची काळजी घेतात, म्हणून मागच्या 25 वर्षांपासून पुतिन रशियावर राज्य करतायत
Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन यशस्वी का आहेत? या बद्दल अनेक कथा आहेत. पण पुतिन यांनी स्वत: त्या चार गोष्टींचा उल्लेख केला. ज्यामुळे ते सर्वोच्च पदावर आहेत. पुतिन नेमका विचार कसा करतात ते समजून घ्या.

मागच्या 25 वर्षांपासून रशियावर व्लादिमीर पुतिन यांचं शासन आहे. या दरम्यान अनेक नेते पुतिन यांच्या विरोधात उभे राहिले. पण एकही पुतिन यांच्यासमोर टिकला नाही. हे नेते रशिया सोडून निघून गेले किंवा रशियातच संपले. या दरम्यान रशियन जनता सुद्धा पुतिन यांच्यासोबत राहिली. 2024 रशियन निवडणुकीत पुतिन यांना 88 टक्के मतं मिळाली. रशिया सारख्या सुपरपावर देशात पुतिन सतत यशस्वी का होतायत? या विषयी अनेक थ्योरिज आहेत.
व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या यशाचा 4 नव्या सिद्धांताचा फॉर्म्युला सांगितला. पुतिन यांच्यानुसार ते प्रत्येकवेळी या सिद्धाताचं पालन करतात. मग, भले स्थिती कशीही असो.
व्लादिमीर पुतिन एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ते कधी मागे वळून पाहत नाहीत. हे केलं असतं तर बरं झालं असतं, असा पुतिन कधी विचार करत नाहीत. मी मागचा विचारही करत नाही. वर्तमान आणि भविष्यावर काम करतो.
मी नेहमी सतर्क असतो. एका प्रश्नाला उत्तर देताना पुतिन म्हणाले की, मी गुप्तचर एजंट होतो. मला माहित असतं कोण कधी काय करतय. मी स्वत: एक्टिव असतो. राजकारणात येण्यापूर्वी पुतिन केजीबी एजंट होते.
पुतिन मेहनत करण्यापासून मागे हटत नाहीत. पुतिन एका इंटरव्यूमध्ये अलीकडेच म्हणालेले की, अमेरिकी दूत स्टीव विटकॉक यांच्यासोबत मी पाच तास बैठक केलेली. बैठकीत विटकॉफ दोन जणांसोबत होते. मी एकटाच होतो.
स्वत:चा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार
73 वर्षांचे पुतिन रशियाचे आजीवन राष्ट्रपती राहतील. पुतिन यांना स्वत:चा उत्तराधिकारी निवडण्याचा सुद्धा अधिकार आहे. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर पुतिन यांनी रशियाचा विस्तार केला आहे. सध्या युक्रेनचे तीन भाग रशियाच्या ताब्यात आहेत. पुतिन यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात रशियाचे अनेक देशांसोबत राजनैतिक संबंध मजबूत झाले.
यात उत्तर कोरिया आणि चीन हे प्रमुख देश आहेत. सध्या या दोन देशांसोबत रशियाचे घनिष्ठ संबंध आहेत. उत्तर कोरिया युद्धात जाहीरपणे रशियासोबत आहे.
