India Russia Deal : पुतीन यांच्या भेटीनंतर पंतप्रधानांची मोठी घोषणा, PM मोदी नेमकं काय म्हणाले? वाचा…
PM Modi and Putin Meeting : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार झाले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज पुतीन यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षरी झाली. या करारानंतर दोन्ही नेत्यांनी आज झालेल्या कराराविषयी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी या करारामुळे दोन्ही देशांमधील आयात-निर्यात वाढणार असल्याची माहिती दिली. तसेच या करारांमुळे भारताच्या मेक इन इंडिया मिशनला बळ मिळणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
PM मोदींनी मानले पुतीन यांचे आभार
दोन्ही नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ’15 वर्षांपूर्वी 2010 मध्ये दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक करार झाला होता. गेल्या अडीच दशकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दोन्ही देशांतील नाते सातत्याने पुढे नेले आहे. त्यांच्या नेतृत्वात चांगल्या-वाईट अशा दोन्ही परिस्थितीत दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. माझे मित्र पुतीन यांचे, भारताप्रती असलेल्या सकारात्मक नात्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.’
मेक इन इंडियाला आणखी बळकटी मिळणार
पुढे बोलताना, पंतप्रधानमोदी म्हणाले की, ‘ऊर्जा सुरक्षा हा भारत-रशियातील व्यापाराचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. नागरी अणुऊर्जेतील दशकांपूर्वीचे सहकार्य आमच्या स्वच्छ ऊर्जा गरजांना पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण राहिले आहे. आम्ही पुढेही हे सहकार्य चालू ठेवू. जगभरातील सप्लाय चैन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या खनिजांमधील आमचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पुढे बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘जहाजबांधणीबाबत झालेल्या करारात मेक इन इंडियाला आणखी बळकटी देण्याची क्षमता आहे. हे आमच्या विन-विन सहकार्याचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे, जे रोजगार, कौशल्ये आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देईल.’
Addressing the joint press meet with President Putin.@KremlinRussia_E https://t.co/ECjpvWj7CF
— Narendra Modi (@narendramodi) December 5, 2025
रशियन पर्यटकांसाठी मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘भारत आणि रशिया युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत लवकरात लवकर एफटीए अंतिम होणार आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवण्याला प्राधान्य दिले जात आहे. यासाठी 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर स्वाक्षरी झाली आहे. आता भारत रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांसाठी मोफत ई-टूरिस्ट व्हिसा सुरू करणार आहे अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे.
