AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Putin’s visit to India : रशिया आणि भारतामध्ये कोण-कोणते महत्त्वाचे करार? जाणून घ्या एका क्लिकवर

रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे भारत दौऱ्यावर आहेत, यावेळी भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत, या करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

Putin's visit to India : रशिया आणि भारतामध्ये कोण-कोणते महत्त्वाचे करार? जाणून घ्या एका क्लिकवर
भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 05, 2025 | 4:03 PM
Share

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यामध्ये जवळपास दीड तास बैठक झाले. यादरम्यान रशिया आणि भारतामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. यामध्ये आरोग्य, शिक्षण, अन्न धान्य सुरक्षा, फर्टिलायझर, टपाल सेवा, शिपिंग आणि ट्रान्सपोर्ट या सारख्या करारांचा समावेश आहे. भारत आणि रशियादरम्यान कामगारांसंदर्भात एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारांतर्गत आता भारतातील लोकांना कामासाठी रशियाला जाता येणार आहे, यामुळे काही प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये बैठक पार पडली, या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, भारत आणि रशियाच्या 23 व्या शिखर परिषदेमध्ये पुतिन यांचं स्वागत करताना मला आनंद होत आहे. पुतिन यांचा भारत दौरा अशावेळी होत आहे, ज्यावेळी रशिया आणि भारतामधील द्विपक्षीय संबंध एक-एक ऐतिहासिक माईलस्टोन पार करत आहेत. गेल्या आठ दशकांमध्ये जगभरात अनेक चढ उतार पहायला मिळाले, मानवतेला अनेक आव्हानं आणि संकटांचा सामना करावा लागाला आहे. मात्र हे सर्व होत असताना देखील भारत आणि रशियाची मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ राहिली आहे. एकमेकांचा सन्मान आणि विश्वासावर ही मैत्री टिकलेली आहे, ही मैत्री काळाच्या कसोटीवर नेहमीच खरी ठरली आहे, असं यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत, गुरुवारी पुतिन यांचं भारतामध्ये आगमन झालं. भारतामध्ये पुतिन यांचं भव्य स्वागत करण्यात आलं, त्याबद्दल त्यांनी या पत्राकार परिषदेमध्ये बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. काल मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान