AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचे नवे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू? थेट डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, म्हणाले, ते…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठे विधान केले. त्यांनी इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल विधान केले. गेल्या काही दिवसांपासून मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

इराणचे नवे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू? थेट डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, म्हणाले, ते...
Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 15, 2026 | 9:55 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 16 वा दिवस आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर भीषण हल्ला केला आणि युद्धाला सुरूवात केली. त्यानंतर एका मागून एक इराणकडूनही ज्या देशामध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे मोठे हल्ले करण्यात आले. हेच नाही तर अमेरिकन दूवातासालाही टार्गेट करण्यात आले. अमेरिकेच्या हल्ल्यात थेट इराणच्या सर्वाेच्च नेता ठार झाल्यानंतर इराण अधिकच घातक बनला. आखाती देशांची सुरक्षा देखील या युद्धात धोक्यात आली. होर्मुज सागरीमार्ग इराणकडून बंद करण्यात आल्याने मोठा हाहाकार उडाला असून थेट कच्च्या तेलांचा किमती वाढताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा असून थेट हॉटेल बंद करण्याची नामुष्की आली. हजारो लोकांच्या हातून काम केले.

दुसरीकडे अनेक देशांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच अन्नसाठा शिल्लक आहे. इराणकडून यादरम्यान सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करण्यात आले. मात्र, अमेरिकेने केलेल्या 28 तारखेच्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई जखमी झाले होते, त्यांच्या पायाला दुखापत झाली. सर्वाेच्च नेते म्हणून पदभार स्विकारल्यानंतर इराणी जनतेसाठी त्यांनी खास संदेश दिला.

होर्मुज सामुद्रधुनी बंद बदलही त्यांनी मोठे विधान केले आणि इराण हे युद्ध लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोजतबा खामेनेई यांच्या आरोग्याबाबत विविध चर्चा केल्या जात आहेत. मोजतबा खामेनेई यांचा एक पाय कापला असून ते कोमात असल्याचा दावाही करण्यात आला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मोजतबा खामेनेई जिवंत आहे की नाही हे माहिती नाही. कारण त्यांना आतापर्यंत कुणीही दाखवले नाही. मला असे ऐकायला मिळत आहे की, तो जिवंतच नाही. जर तो जिवंत असेल तर त्याने आपल्या देशासाठी काम करावे आणि आत्मसमर्पण करावे. मोजतबा खामेनेई याच्या मृत्यूची बातमी सध्यातरी अफवा आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल