AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये हाहाकार! युद्धात इराणचे सर्वात मोठे नुकसान, इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात थेट अंतराळ..

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धात आतापर्यंत अब्जो रूपयांचे नुकसान झाले. अमेरिका या युद्धात थेट उतरल्याने मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच आता अत्यंत घातक हल्ला इस्त्रायलकडून इराणवर करण्यात आला.

इराणमध्ये हाहाकार! युद्धात इराणचे सर्वात मोठे नुकसान, इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात थेट अंतराळ..
Israel attack Iran
| Updated on: Mar 15, 2026 | 9:34 AM
Share

इराणच्या महत्वाच्या बेटावर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून अमेरिकेला थेट मोठा इशारा देण्यात आला. इराणच्या ऊर्जा संपत्तीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही थेट अमेरिकेसोबत संबंध असलेल्या कंपन्यांना उडवू असे इराणकडून सांगण्यात आले. आता इस्त्रायलकडून थेट इराणची राजधानी तेहरानच्या आसपास मोठे हवाई हल्ले करण्यात आले. इस्त्रायलकडून आता इराणच्या पायाभूत सुविधांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. यामुळे परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. या हल्ल्यानंतर इराणचे अंतराळ संशोधन केंद्र यासोबतच हवाई संरक्षण प्रणाली तयार करणारा कारखाना नष्ट करण्यात आला. हा इराणला मोठा धक्का मानला जात आहे. इस्त्रायलने टार्गेट करूनच हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईने खळबळ उडाली. इराणच्या फक्त तेलासाठ्यांवरच नाही तर त्यांच्या पायाभूत सुविधांनाही आता टार्गेट केले जात आहे. इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या दाव्यावर इराणकडून अजून काही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

इस्त्रायलने याठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर मोठी आग लागल्याचे सांगितले जात आहे. इराणकडूनही इस्त्रायलच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले जात आहेत. आयडीएफच्या मते, हवाई हल्ल्यांच्या या लाटेने तेहरानमधील इराणी राजवटीच्या पायाभूत सुविधांना टार्गेट केले जाणार आहे. इतके मोठे हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेकडून होत असतानाही इराण खंबीरपणे उभा आहे.

आम्ही रक्त सांडण्यास तयार आहोत पण आमची जमीन देण्यास नाही आणि शेवटपर्यंत लढणार असल्याचे मोठे विधान इराणकडून करण्यात आले. हेच नाही तर मोठे युद्ध लढण्याचा इराणला अनुभल असल्याचेही इराणने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलच्या निशाण्यावर इराणचे अंतराळ संशोधन केंद्र होते. शेवटी आता त्यावर मोठा हल्ला करण्यात आला.

जिथे हा हल्ला झाला तिथे संरक्षण उपग्रहांच्या विकासासाठी वापरल्या जाणाऱ्या धोरणात्मक प्रयोगशाळा होत्या. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणचे नवे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीलबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर मोजतबा खामेनेई जिवंत नसल्याची शंका नुकताच अमेरिकेकडून वर्तवण्यात आली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल