AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, तासाभरात काय काय घडलं?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढला असून पाकिस्तानने कंधारमध्ये तालिबानच्या तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या संघर्षात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले असून सीमावर्ती भागात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, तासाभरात काय काय घडलं?
Pakistan Afghanistan Border
| Updated on: Mar 15, 2026 | 10:00 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील कंधार प्रांतात तालिबानच्या लष्करी तळांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानच्या विविध शहरांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली, असा दावा इस्लामाबादने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील रावळपिंडी, कोहट आणि क्वेट्टा यांसारख्या प्रमुख शहरांच्या आकाशात अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळले होते. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी हे ड्रोन पाडण्यात यश मिळवले असले तरी, त्यांचे ढिगारे नागरी वस्त्यांमध्ये पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या ड्रोनचे अवशेष क्वेट्टा आणि रावळपिंडीमध्ये पडल्याने दोन मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या ड्रोन घुसखोरीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी इस्लामाबादचे हवाई क्षेत्र काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले होते. पाकिस्तानने या घटनेला रेड लाईन क्रॉस करणे, असे म्हटले होते.

तालिबान सरकारकडून निषेध

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या दाव्यानुसार, पाकिस्तानात घुसलेले हे ड्रोन अफगाणिस्तानातील कंधार येथील तळांवरून नियंत्रित केले जात होते. या माहितीच्या आधारे, पाकिस्तानच्या वायूसेनेने कंधारमधील तालिबानशी संबंधित तांत्रिक सुविधा आणि शस्त्रास्त्रांच्या डेपोंवर हवाई हल्ले केले आहेत. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, हे तळ प्रामुख्याने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि त्यांच्याशी संबंधित लढाऊ गटांकडून वापरले जात होते. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या हल्ल्यांत काबूल आणि पूर्व अफगाणिस्तानात किमान ६ नागरिक ठार झाले असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी विमानांनी कंधार विमानतळाजवळील काम एअर या खासगी कंपनीच्या इंधन डेपोला टार्गेट केले. हे इंधन नागरी विमान वाहतूक आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मानवतावादी उड्डाणांसाठी राखीव होते, असा दावा अफगाणिस्तानने केला आहे.

पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला

या हवाई हल्ल्यांनंतर दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमध्येही चकमकी सुरू झाल्या आहेत. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार, त्यांच्या सैन्याने पूर्व कुनार आणि नांगरहार प्रांतात पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला असून १४ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे. तर इस्लामाबादमधील माहिती मंत्रालयाने तालिबानचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

या तणावाच्या दरम्यान, वायव्य पाकिस्तानच्या लक्की मारवत जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला एक भीषण बॉम्बस्फोट झाला. यात ७ पाकिस्तानी पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानमधील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या दोन्ही देशांमधील संवाद खुंटला असून सीमावर्ती भागात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल