AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Eyestrain | ऑनलाईन अभ्यासामुळे डोळ्यांवर ताण, मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढल्या!

डोळे लाल होणे, डोळ्यांनी अस्पष्ट दिसणे, नजर कमजोर होणे यासारख्या समस्या देखील वाढल्या आहेत. यालाच वैद्यकीय भाषेत ‘डिजिटल आयस्ट्रेन’ (Digital Eyestrain)  म्हणतात.

Digital Eyestrain | ऑनलाईन अभ्यासामुळे डोळ्यांवर ताण, मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढल्या!
प्रातिनिधीक फोटो
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 30, 2020 | 6:47 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गामुळे मुलांचे शालेय वर्ग आता ‘डिजिटल’ (Online Classes) झाले आहेत. त्यामुळे त्यांचा बहुतेक वेळ आता संगणक, मोबाईल किंवा टॅब्लेटच्या समोर जातो. यामुळे डोळ्यांवर ताण पडत आहे. डोळे लाल होणे, डोळ्यांनी अस्पष्ट दिसणे, नजर कमजोर होणे यासारख्या समस्या देखील वाढल्या आहेत. यालाच वैद्यकीय भाषेत ‘डिजिटल आयस्ट्रेन’ (Digital Eyestrain)  म्हणतात. ‘डिजिटल आय स्ट्रेन’ कसा ओळखावा आणि कसा टाळावा हे याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे (Childrens Facing Digital Eyestrain due to Online classes).

डिजिटल उपकरणे योग्य प्रकारे हाताळली जात नसल्याने डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. जसे की, स्क्रीनकडे सतत पाहणे, मोबाईल अथवा टॅब्लेट चुकीच्या पद्धतीने पकडणे यामुळे उपकरणांतून निघणारा प्रकाश थेट डोळ्यात जातो. संगणकातून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असतो.

‘डिजिटल आयस्ट्रेन’विषयी डॉक्टर सांगतात…

शार्प साइट ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. शीतल किशनपुरिया यांच्या मते, पालकांनी मुलांच्या डिजिटल उपकरणांच्या वापरावर लक्ष ठेवले पाहिजे. ‘डिजिटल आयस्ट्रेन’नुसार डोळे दुखणे, चुरचुरणे,पाठ- मान-डोके दुखणे यासारख्या समस्या दिसत असल्यास त्यावर लक्षात ठेवले पाहिजे. लहान मुलांचे डोळे पूर्णपणे विकसित झालेले नसतात, त्यामुळे ते लवकर ‘मायोपिया’ला बळी पडू शकतात. (Childrens Facing Digital Eyestrain due to Online classes)

‘डिजिटल आयस्ट्रेन’ची लक्षणे

‘डिजिटल आयस्ट्रेन’च्या (Digital Eyestrain) लक्षणांमध्ये सुरुवातीला डोळ्यांवर ताण पडून ते चुरचुरायला लागतात. डोळ्यांत पाणी येते, डोळे दुखतात, डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागते. यासह, डोकेदुखी आणि तणाव देखील वाढायला लागतो. यामुळे कधीकधी चिडचिडेपणा देखील येतो. ‘डिजिटल आयस्ट्रेन’मध्ये सुरुवातीला या समस्या कमी जाणवतात. परंतु, पुढे त्या वाढत जातात आणि पाठदुखी, मान दुखी आणि झोपेच्या समस्यादेखील उद्भवू शकतात.

‘डिजिटल आयस्ट्रेन’ टाळण्याचे उपाय

‘डिजिटल आयस्ट्रेन’ (Digital Eyestrain) टाळण्यासाठी अथवा त्यावरील उपचारांबाद्द्ल सांगताना नेत्रतज्ज्ञ डॉ. शीतल किशनपुरीया म्हणतात की, लहान मुलांना शक्यतो डिजिटल स्क्रीनपासून दूर ठेवले पाहिजे. तर, मध्यमवयीन मुलांना एका तासासाठीच डिजिटल उपकरणांचा वापर करू द्यावा. मुलांसह मोठ्यांनीही डिजिटल उपकरणे वापरताना योग्य प्रकारे बसले पाहिजे. झोपून मोबाईल अथवा टॅब्लेट वापरू नये. संगणक अथवा लॅपटॉपसमोर बसताना शक्यतो खुर्ची, टेबल वापरावे.

याव्यतिरिक्त स्क्रीन आणि आपल्या डोळ्यांमध्ये किमान एक हात म्हणजे 20 इंच अंतर ठेवले पाहिजे. स्क्रीन ब्राईटनेस नेहमी कमी ठेवावा. 20-20चा नियमही पाळावा. या नियमानुसार दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्यावा, स्क्रीनच्या उजेडापासून बाजूला होत डोळे बंद करावेत. याशिवाय फाँटचा आकार वाढविणे, वारंवार डोळे मिचकावणे, अँटी-ग्लेअर चष्मा वापरणेदेखील फायदेशीर ठरते.

(Childrens Facing Digital Eyestrain due to Online classes)

संबंधित बातम्या :

World Heart Day 2020 | ‘या’ पाच गोष्टी ठेवतील तुमच्या हृदयाला निरोगी!

Depression | नैराश्य म्हणजे नेमकं काय? नैराश्याने आत्महत्येचा विचार का येतो?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...