Cockroach: स्वयंपाक घरात झुरळांनी मांडलाय उच्छाद, हे 5 घरगुती पदार्थ वापरुन पाहा
How To Get Rid Of Cockroach: तुमच्या स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये कॉक्रोच अर्थात झुरळांचा प्रादुर्भाव होत आहे का ? महागड्या आणि हानिकारक रासायनिक औषधांच्या फवारीच्या ऐवजी घरातील मसाल्यांचे पदार्थ वापरुन देखील तुम्ही झुरळांचा बंदोबस्त करु शकता....कसे ते पाहूयात....

How To Get Rid Of Cockroach: स्वयंपाक घरात एक जरी झुरळ दिसले तर संपूर्ण घर आपल्याला अस्वच्छ वाटू लागते. झुरळांच्या त्रासाने गृहिणी वैतागलेल्या असतात. त्यामुळे स्वयंपाक घरातील प्रत्येक वस्तू आपल्या मनात शंका निर्माण करते. झुरळ अन्नपदार्थांना दुषितच करत नाही तर बॅक्टेरिया देखील पसरवत असतात. अनेकदा बाजारातील विषारी केमिकल स्प्रे खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. स्प्रे किंवा पेस्ट कंट्रोलने काही दिवस तर या समस्येतून सुटका मिळते. परंतू पुन्हा किचन, बाथरुम आणि फ्रीजच्या जवळ झुरळांचा डेरा सुरु होतो. तर स्वयंपाक घरातील काही पदार्थांचा वापर करुन झुरळांना कसे पळवायचे ते पाहूयात…
घरगुती पदार्थांचा वापर करुन तुम्हा किचनमधून झुरळांना पळवू शकता. घरगुती उपायांनी झुरळं लगेच समुळ नष्ट होत नाहीत, मात्र, त्यांचा वावर नक्की कमी करतात. घरात जास्त झुरळं झाली असेल तर पेस्ट कंट्रोल करणे हाच सर्वात बेस्ट उपाय असतो.
1. बेकिंग सोडा आणि साखरेचे मिश्रण: अनेकजण कॉक्रोचपासून सुटका मिळण्यासाठी बेकींग सोडा आणि साखरेचा उपाय आजमावतात. यातील साखर झुरळांना आकर्षित करते तर बेकींग सोडा त्यांच्या शरीरावर परिणाम करुन त्यांना पळवून लावतो. जेथे झुरळं फिरतात तेथे हे मिश्रण थोडे थोडे टाकावे. सिंकच्या खाली, फ्रिजच्या जवळ, किचन ओटा आणि सर्व संभाव्य जागेत हे मिश्रण पसरावे.
2. तेजपत्ता : भारतीय स्वयंपाक घरातील तेजपत्ता हा मसाल्यातील पदार्थ झुरळांना पळवण्यास मदतीला येऊ शकतो. तेजपत्ता ज्याला तमालपत्र देखील म्हणतात.त्याचा सुंगध झुरळांना आवडत नाही. तेजपत्ता हळका चुरगळून कपाटाच्या कोपऱ्यात, किचन कॅबिनेट, स्टोरेज एरियात आणि कोपऱ्यात ठेवल्याने झुरळांना प्रतिबंध येऊ शकतो.
3. लसूण आणि कांद्याची पेस्ट: लसूण आणि कांद्याचा तीव्र सुंगध झुरळांना त्रास देतो. दोन्हींची पेस्ट तयार करुन फटीतून टाकावी. ड्रेनच्या जवळ थोडी ही पेस्ट लावावी. मात्र, याचा वास किचनमध्ये बराच वेळ राहू शकतो.
4. काकडीच्या साली : कॉक्रोचला घरातून पळवण्यासाठी काकडीच्या सालीचा वापर करावा. त्यामुळे काकडीचा वास झुरळांना सहन होत नाही. ताजीच्या सालींना सिंक, कपाट आणि किचनच्या कोपऱ्यात ठेवावेत. लक्षात ठेवा काकडीच्या साली सुकल्यानंतर त्यांना लगेच बदला.
5. संत्री वा लिंबूच्या साली : संत्री किंवा लिंबाच्या सालीत नैसर्गिक ऑईलचा सुंगध कॉक्रोचला दूर राखण्यात मदत होऊ शकते. तुम्ही संत्र्यांच्या साली वा पाण्यात सिट्रस ऑईलचा स्प्रे त्याजागी करु शकता. कॉक्रोच जास्त दिसत असतील संत्र्याची साली जागोजागी ठेवू शकता. त्यामुळे किचनमध्ये फ्रेशनेस देखील तयार होतो.
6. घरात किचन नेहमी स्वच्छ ठेवावे, जेवणाच्या वस्तू नेहमीच एअर टाईट डब्यात पॅकबंद ठेवाव्यात, सिंक आणि पाईपमधून होणारी गळती त्वरीत रोखावी, भिंती आणि लादीला असलेल्या फटी तातडीने बुजवाव्यात, कचऱ्याचा डबा रोज स्वच्छ राखावा.