पावसाळ्यात तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असेल तर ‘हे’ 5 आश्चर्यकारक टिप्सचा करा अवलंब, केस राहतील निरोगी

पावसाळ्यात विशेष आरोग्यासोबतच त्वचेची आणि केसांचीही काळजी घेणे आवश्यक असते. केसांबद्दल बोलायचे झाले तर, या ऋतूत केस तुटणे आणि कोरडेपणाची समस्या सामान्य होते. केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात...

पावसाळ्यात तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असेल तर हे 5 आश्चर्यकारक टिप्सचा करा अवलंब, केस राहतील निरोगी
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Aug 21, 2025 | 5:53 PM

पावसाळ्यात हवामान आल्हाददायक असले तरी हा ऋतू अनेक आव्हाने घेऊन येतो. या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. दुसरीकडे आरोग्यासोबतच त्वचेची आणि केसांचीही अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. केसांबद्दल बोलायचे झाले तर, बरेच लोकं तक्रार करतात की पावसाळ्यात त्यांचे केस गळतात. तसेच अनेकजण केस कुरळे होण्याची तक्रार करतात.

जर तुम्हालाही पावसाळ्यात अशाकाही केसांच्या समस्या भेडसावत असेल, तर आजच्या लेखात आपण काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून पावसाळ्यात तुमचे केस तुटण्यापासून वाचतील. यासोबतच केस सिल्की आणि चमकदार देखील होतील. चला त्या टिप्सबद्दल सविस्तर जाणून घेऊयात –

आठवड्यातून दोनदा तेल लावा

केसांना तेल लावणे खूप महत्वाचे आहे. तेल लावल्याने तुमच्या केसांना पोषण मिळते. तसेच कोरडेपणाची समस्या देखील दूर होते. आठवड्यातून दोन दिवस केसांना तेल लावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल वापरू शकता. तसेच तुम्ही रात्रभर केसांना तेल लावून ठेऊ शकता. किंवा तुम्हाला हवे असल्यास, केसांना तेल लावून दोन ते तीन तासांनी केस धुवू शकता.

कंडिशनर वापरा

पावसाळ्यात केसांना हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे . जर तुम्हाला केसांचा कोरडेपणा दूर करायचा असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा कंडिशनर वापरा. यामुळे केसांना ओलावा मिळेल. यासोबतच कोरडेपणाची समस्याही दूर होईल.

कोमट पाण्याने केस धुवा

पावसाळ्यात तुम्ही तुमचे केस गरम किंवा थंड पाण्याने धुवू नयेत. त्याऐवजी तुम्ही तुमचे केस कोमट पाण्याने धुवा. यामुळे स्कॅल्प स्वच्छ राहील आणि केसांची मुळे मजबूत होतील.

पावसात बाहेर जाणे टाळा

पावसाचे पाणी तुमच्या आरोग्यासाठी किंवा केसांसाठी चांगले नाही. हे पाणी घाणेरडे आहे. जर तुमचे केस पावसाच्या पाण्याने ओले झाले तर तुम्ही ताबडतोब स्वच्छ पाण्याने केस धुवावेत.

भरपूर पाणी प्या

तुम्हाला जर पावसाळ्याच्या दिवसात तुमचे केस निरोगी ठेवायचे असतील तर दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे केसांना ओलावा मिळेल. यासोबतच कोरडेपणाची समस्याही दूर होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

 

Follow Us