Diwali 2026: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई होईल झटपट! वेळ, पैसा आणि मेहनत वाचवण्यासाठी फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स

Cleaning Tips for Diwali: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीची तयारी सगळीकडे जोरात सुरु आहे. तुम्हीही घराची साफसफाई करायला सुरुवात केली असेल किंवा या वीकेंडला साफसफाई करणार असाल तर आधी या टिप्स पाहा. हे तुमचे काम सोपे करेल.

Diwali 2026: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई होईल झटपट! वेळ, पैसा आणि मेहनत वाचवण्यासाठी फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स
Diwali
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 24, 2026 | 10:21 AM

दिवाळी म्हटली की सर्वात कठीण काम वाटते ते म्हणजे घराची साफसफाई. ६ नोव्हेंबर पासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. तुम्ही अजूनही साफसफाई सुरु केली नसेल, किंवा या वीकेंडला तुम्ही साफसफाई करणार असाल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही कमी वेळेत आणि मेहनत करून घर स्वच्छ करू शकता. अनेक वेळा मेहनत करूनही घर हवे तसे साफ वाटत नाही. अशा परिस्थितीत काही क्लीनिंग टिप्स लक्षात ठेवा. जे तुमचे घर स्वच्छ ठेवण्यास मदत करेल. चला जाणून घ्या या काही क्लीनिंग टिप्स, जे तुमचे काम तर सोपे करतीलच शिवाय तुमची वेळ, पैसा आणि मेहनतही वाचवतील.

किचन सिंक साफ करणे

Loading...

किचन सिंक नेहमी चमकते ठेवणे खूप अवघड असते. स्टेनलेस स्टीलची सिंक खरकट्या भांड्यामुळे लवकर चिकट दिसू लागते. हे साफ करण्यासाठी तुम्ही लिंबाची साल वापरू शकता. वापरलेल्या लिंबाच्या सालीवर वॉशिंग पावडर शिंपडून त्याने किचन सिंक स्वच्छ करा. सिंक लवकर साफ होईल.

ओव्हन स्वच्छ करण्यासाठी ट्रिक 

ओव्हनमध्ये विविध प्रकारचे अन्न शिजवल्याने आणि गरम केल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागते. या वासापासून सुटका हवी असेल तर एका भांड्यात पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस मिक्स करा. हे पाणी आता साधारण १० मिनिटे ओव्हनमध्ये गरम करा. ओव्हनमधील सर्व वास निघून जाईल.

लॅपटॉप कीबोर्डची स्वच्छता 

साधारण प्रत्येक जण लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वापरतो. पण त्याच्या कीबोर्डवर साचलेल्या घाणीकडे फार कमी लक्ष दिले जाते. जर तुमचा कीबोर्ड खराब झाला असेल, त्यावर धूळ जमा झाली असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरा. हे सर्व कीज स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोपऱ्यातील घाण काढून टाकेल.

प्राण्यांचे फर कसे स्वच्छ करावे 

हल्ली अनेक लोकांकडे पाळी प्राणी असतात. पण जेव्हा त्यांचे केस घरात पडतात तेव्हा ते खूप खराब दिसतात आणि साफ करणे सुद्धा अवघड वाटते. जर तुमच्या पलंगावर आणि सोफ्यावर पाळीव प्राण्याचे फर अडकले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी जुना सॉक्स वापरा. हे मोजे सहजपणे फर पकडतील आणि झटपट स्वच्छता होईल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us