ऑक्टोबर सुरू होताच त्वचा कोरडी पडतेय? फक्त ‘या’ गोष्टी करा, चेहऱ्यावरचा ग्लो पुन्हा दिसेल!

ऑक्टोबर हीटचा फक्त आरोग्यावरच नाही तर त्वचेवर देखील परिणाम होतो. तुमची त्वचा देखील कोरडी होत असेल तर या सोप्या स्किन केअर टिप्स फॉलो करा.

ऑक्टोबर सुरू होताच त्वचा कोरडी पडतेय? फक्त ‘या’ गोष्टी करा, चेहऱ्यावरचा ग्लो पुन्हा दिसेल!
Follow these skin care tips for dry skin in october to get glow
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Oct 07, 2026 | 6:56 PM

वातावरणात झालेल्या बदलांचा जसा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तसाच आपल्या त्वचेवर, केसांवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. ऑक्टोबर मध्ये अचानक वाढलेल्या तापमानाचा त्वचेवर परिणाम होतो आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. सकाळी आणि संध्याकाळी त्वचा कोरडी वाटत असली तरी, दुपारी घामामुळे ती तेलकट, चिकट होते. तुमचा चेहरा नेहमी फ्रेश दिसावा असे वाटत असेल तर तुमच्या त्वचेची थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग, ऑक्टोबरच्या बदलत्या हवामानात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.

त्वचा हायड्रेटेड ठेवा

ऑक्टोबरमध्ये शरीर हायट्रेडेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच तुमची त्वचा मऊ आणि आर्द्र ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरावे. या ऋतूत वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. कारण ऑइल बेस्ड मॉइश्चरायझरमुळे तुमची त्वचा आणखी तेलकट होऊ शकते आणि त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात. यामुळे तुम्हाला पिंपल्सचा त्रास होऊ शकतात. जर तुम्हाला तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवायची असेल, तर पाण्याचे सेवन कमी होऊ देऊ नका.

Loading...

सनस्क्रीन लावा

बहुतेक लोक केवळ उन्हाळ्यातच सनस्क्रीन वापरतात. पण तुमच्या त्वचेच्या बाबतीत ही चूक करू नका. सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे आणि हवामानाचे संतुलन राखण्यास मदत करते. तुम्ही घरी असाल तरीही, सनस्क्रीनचा एक थर नक्की लावा. ऑक्टोबर महिन्यात सनस्क्रीन लावायला विसरू नका.

त्वचा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे

या ऋतूत त्वचा थोडी कोरडी वाटू शकते. त्यामुळे, लोक त्वचेला एक्सफोलिएट करायला विसरतात. मात्र, चेहऱ्यावर कोणतेही उत्पादन लावण्यापूर्वी, त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा, त्या उत्पादनाचा त्वचेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे त्वचा व्यवस्थित स्वच्छ असल्याची खात्री करा

कोरड्या त्वचेसाठी हे करा

जर तुमची त्वचा आधीच खूप कोरडी होत असेल, तर पाण्याने चेहरा धुणे टाळा. तसेच कोरडेपणा कमी करण्यासाठी मध आणि बदामाचे मिश्रण लावा. थोड्या वेळाने पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. रात्री तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुकूल अशी चांगली नाईट क्रीम वापरा, जी रात्रभर तुमच्या त्वचेला आर्द्रता देण्यास मदत करेल.

घरगुती उपाय करा

या कोरड्या वातावरणात त्वचेची जास्त काळजी घेण्यासाठी केमिकल असलेले प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करा. त्वचेच्या प्रकारानुसार अनुकूल असणारे फेस पॅक, फेस मास्क वापरा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us