निसर्गप्रेमींना स्वर्गापेक्षा कमी नाही भारतातील ‘हे’ बोटॅनिकल गार्डन, नक्की भेट द्या

जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात काहीवेळ शांत क्षण घालवायचे असतील, तर भारतातील सुंदर बोटॅनिकल गार्डनला भेट देणे हा एक उत्तम पर्याय आहे. चला आपण हे गार्डन भारतात कोणत्या ठिकाणी आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

निसर्गप्रेमींना स्वर्गापेक्षा कमी नाही भारतातील हे बोटॅनिकल गार्डन, नक्की भेट द्या
IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss
Image Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Jul 16, 2026 | 10:18 PM

निसर्गाच्या सान्निध्यात काहीवेळ शांत क्षण घालवण्याचा एक वेगळाच आनंद असतो. म्हणूनच आजकाल अधिकाधिक लोकं हिरवळ, रंगीबेरंगी फुले आणि दुर्मिळ वनस्पती असलेल्या ठिकाणांना भेट देण्यास पसंती देतात. जर तुम्हालाही निसर्ग सौंदर्य आवडत असेल, तर आपल्या भारतातील या काही बोटॅनिकल गार्डनला भेट देण्यासाठी एक उत्तम प्लॅन करता येईल. येथे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्यासोबतच विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी पाहण्याची संधी मिळते.

भारतात अनेक बोटॅनिकल गार्डन आहेत, जी त्यांच्या अद्वितीय वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी तसेच सुंदर परिसरासाठी प्रसिद्ध आहेत. ही ठिकाणे केवळ निसर्गप्रेमींनाच नव्हे, तर फोटोग्राफी, पक्षीनिरीक्षण आणि शांततेचा आनंद घेणाऱ्यांनाही आकर्षित करतात. रंगीबेरंगी फुलं, उंच झाडे आणि सुस्थितीत असलेली गार्डन भेट दिल्यानंतर अविस्मरणीय बनवतात. चला भारतातील काही सर्वात सुंदर वबोटॅनिकल गार्डनबद्दल जाणून घेऊयात. जिथे तुम्हाला अद्वितीय नैसर्गिक दृश्ये पाहायला मिळतील, तिथे कसे पोहोचायचे आणि भेट देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे देखील जाणून घेऊयात.

तुम्ही भारतातील या 4 सुंदर बोटॅनिकल गार्डनला अवश्य भेट द्या

आचार्य जगदीशचंद्र बोस भारतीय बोटॅनिकल गार्डन (हावडा, पश्चिम बंगाल)

हावडा येथे स्थित हे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध बोटॅनिकल गार्डनपैकी एक आहे. येथे हजारो वनस्पतींची प्रजाती प्रदर्शित केल्या आहेत. येथील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ‘ग्रेट बनियन ट्री’, जे जगातील सर्वात मोठ्या वडाच्या झाडांपैकी एक मानले जाते.

लालबाग बोटॅनिकल गार्डन (बेंगळुरू, कर्नाटक)

बंगळूरच्या मध्यभागी असलेले लालबाग बोटॅनिकल गार्डन सुमारे 240 एकरमध्ये पसरलेले आहे. येथील दुर्मिळ वनस्पती, रंगीबेरंगी फुले आणि ऐतिहासिक ग्लास हाऊस पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी होणारे पुष्प प्रदर्शन हे येथील प्रमुख आकर्षण आहे.

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन(पुणे, महाराष्ट्र)

पुण्यातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनहे हिरवीगार वनराई आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. अनेक दुर्मिळ वनस्पती प्रजाती, रंगीबेरंगी फुले आणि मोकळे हिरवेगार लॉन असलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी, पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफी शौकिनांसाठी एक उत्तम ठिकाणं आहे.

एनबीआरआय वनस्पती उद्यान (लखनौ, उत्तर प्रदेश)

लखनौ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेचे (एनबीआरआय) बोटॅनिकल गार्डन हे त्याच्या विविध वनस्पती आणि वैज्ञानिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. येथे औषधी वनस्पती, शोभेची फुले आणि अनेक दुर्मिळ प्रजातींचा संग्रह आहे. वनस्पती आणि निसर्गात रस असणाऱ्यांसाठी हे एक प्रमुख आकर्षण आहे.

या बोटॅनिकल गार्डनपर्यंत कसे पोहोचावे आणि भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

ही सर्व बोटॅनिकल गार्डनला भेट देण्यासाठी तुम्ही बायरोड, रेल्वे आणि विमान प्रवासाने सहज पोहोचता येते. हावडा, बंगळूर, पुणे आणि लखनौ ही देशातील प्रमुख शहरे असून येथे नियमित रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध आहे. रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावरून संबंधित बोटॅनिकल गार्डनपर्यंत जाण्यासाठी टॅक्सी, बस किंवा मेट्रो सेवेचा वापर करता येतो.

या बोटॅनिकल गार्डनला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि झाडे व फुले पूर्ण बहरलेली असतात. सकाळी किंवा संध्याकाळी भेट देणे अधिक सोयीचे ठरते.

वनस्पती उद्यानाला भेट देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

वनस्पती उद्यानाला भेट देताना स्वच्छता राखा आणि कचरा टाकू नका. झाडे फुले किंवा वनस्पतींना इजा पोहोचवू नका आणि परवानगीशिवाय त्यांची फळे तोडू नका. आरामदायक कपडे आणि बूट घाला आणि उन्हाळ्यात पाण्याची बाटली, टोपी व सनस्क्रीन सोबत आणा.

बागेच्या एखाद्या विशिष्ट भागात प्रवेश प्रतिबंधित असल्यास तो भाग टाळा. इतर अभ्यागतांना सुखद अनुभव मिळावा यासाठी फोटो काढण्याच्या नियमांचे पालन करा आणि शांततापूर्ण वातावरण टिकवून ठेवा.

Follow Us