AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झणझणीत मिरचीचा खर्डा रेसिपी! ज्वारीची भाकरी, कांदा अन् खर्डा …. गावाकडच्या जेवणाची चवच न्यारी

बाजारातल्या लोणच्याला कंटाळात काय? मग तोंडाला लावण्यासाठी काय दुसरा पर्याय नसतो असं देखील होतं ना? पण मग यावर एक गावठी आणि झणझणीत उपाय आहे ना, अहो आपला गावरान मिरचीची खर्डा, एकदा घरी करून तर, तोंडात गावाची ती चव मुरल्याशिवाय राहणार नाही आणि हो अगदी सोपी आहे हो रेसिपी.

झणझणीत मिरचीचा खर्डा रेसिपी! ज्वारीची भाकरी, कांदा अन् खर्डा .... गावाकडच्या जेवणाची चवच न्यारी
मिरचीचा खर्डाImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 20, 2026 | 8:32 PM
Share

गावाकडेच्या जेवणाची गोष्टचं वेगळी असते. ताटात गरमागरम ज्वारीची भाकरी, सोबत कच्चा कांदा आणि तोंडाला पाणी आणणारा झणझणीत मिरचीचा खर्डा असेल तर मग भाजी असो किंवा नसो,जेवणावर मस्त ताव मारता येतो. विशेष म्हणजे हा खर्डा बनवण्यासाठी फार काही साहित्य लागत नाही. घरातल्या हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, आणि थोडंस तेल एवढं असलं तरी काम भागतं. पण खरी गंमत असते ती मिरच्या भाजण्यात आणि त्या पाटा- वरंवट्यावर ठेचण्यात चला तर मग, अस्सल गावठी पद्धतीने झणझणीत खर्डा कसा बनवायचा ते जाणून घ्या.

झणझणीत गावठी खर्डा बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

लसूण मिरच्या 15 ते 20 पाकळ्या, लसूण – 10 ते 12 पाकळ्या, भाजलेल्या शेंगदाणे – अर्धी वाटी, जिरे – अर्धा चमचा, मीठ – चवीनुसार, तेल – 2 ते 3 चमचे, कोथिंबीर – थोडीशी आवडीनुसार, लिंबाचा रस- अर्धा चमचा.

सर्वप्रथम हिरव्या मिरच्या निवडून घ्या

खर्डा बनवण्यासाठी ताज्या, हिरव्यागार मिरच्या घ्या. मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून त्यांचं पाणी पूर्णपणे कोरडं करा. मिरच्यांवर पाणी राहिलं. तर भाजताना तेल उडू शकतं. तुम्हाला खर्डा खूप तिखट हवा असेल तर जास्त तिखट कमी हवं असेल, तर कमी तिखट मिरच्या वापरा.

मिरच्या आणि लसूण छान भाजून घ्या

आता गॅसवर लोखंडी तवा किंवा कढई ठेवा. त्यात थोडंस तेल घाला आणि मिरच्या टाकून मध्यम आचेवर भाजा.सालीवर थोडे काळपट डाग दिसू लागले आणि त्याचा छान भाजलेला सुगंध येऊ लागला की त्या उतरवून घ्या. त्यावर लसूण, शेंगदाणे सुद्धा हलके भाजून घ्यावे. खर्डा अधिक तिखट हवा असेल तर शेंगदाण्याचे प्रमाण कमी ठेवा.

पाटा वरवंट्यावर वाटा

भाजलेल्या मिरच्या आणि लसूण पाटा- वरंवट्यावर घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून सगळं जाडसर कुटायला सुरूवात करा. खर्डा बनवताना मिरच्या अगदी बारीक वाटण्याची गरज नाही. मिरचीचे छोटे तुकडे राहिले, तर खाताना त्याची खरी गावठी चव जाणवते. पाटा वरंवटा नसेल तर खलबत्ता वापरू शकता. मिक्सरमध्येही खर्डा बनवता येतो, पण मिक्सरमध्ये तो जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या.

त्यात शेंगदाणे आणि जिरे घाला

आता कुटलेल्या मिरच्या आणि लसणामध्ये भाजलेले शेंगदाणे घाला. त्यासाोबत अर्धा चमचा जिरेही टाका. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित कुटून घ्या.

खर्ड्याला फोडणी देऊन छान परतुन खा

आता कढईत दोन ते तीन चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात तयार केलेला खर्डा घाला. मंद ते मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्या. परतताना खर्डा सतत हलवत राहा.म्हणजे तो कढईला चिकटणार नाही.या वेळी मिरची, लसूण आणि शेंगदाण्यांचा खमंग वास स्वयंपाकघरभर दरवळू लागेल. खर्डा थोडा तेल सुटेपर्यंत परतला की गॅस बंद करा. आवडच असल्यास शेवटी बारीक चिरलेली कोंथिंबीर घालू शकता.

शेवटी लिंबाचा रस घालून चव वाढवा

खर्डा तयार झाल्यावर त्यात थोडासा लिंबाचा रस घालू शकता.यामुळे तिखटपणासोबत हलकी आंबट चवही मिळते. मात्र लिंबाचा रस घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे.

खर्डा तयार झाला की आता त्याच्यासोबत काय खायचं, हा प्रश्नच उरत नाही. गरमागरम ज्वारीची भाकरी, कच्चा कांदा आणि खर्डा हा एकदम झकास बेत आहे. बाजरीच्या भाकरीसोबतही तो छान लागतो. घरात पिठलं किंवा साधी वरण- भाताची तयारी असेल, तरी खर्ड्यामुळे जेवणाची चव वाढते

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!