AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहारात सामील करा ‘हे’ घटक, वजन नियंत्रणात राहील, सर्दीपासूनही बचाव होईल!

अयोग्य आहारामुळे, शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते.

आहारात सामील करा ‘हे’ घटक, वजन नियंत्रणात राहील, सर्दीपासूनही बचाव होईल!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 18, 2021 | 7:11 PM
Share

मुंबई : हिवाळ्यात काही लोक फार लवकर आजारी पडतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे अचरट-बचरट अन्न. अयोग्य आहारामुळे, शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. आपल्यालाही अशी काही समस्या असल्यास, हिवाळ्याच्या काळात आपल्या दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात ‘या’ काही घटकांचा समावेश करा. यामुळे आपले आरोग्य सुधारेल, तसेच आपले शरीर आतून उबदार ठेवेल (Healthy flours for good health and immunity during winter).

बाजरी

गव्हाची चपाती आपण प्रत्येक हंगामात खातो. परंतु, हिवाळ्यात आपल्या जेवणात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. बाजरीमध्ये फायबर आणि पोटॅशियम भरपूर असतात. जर, आपल्याला हिवाळ्याच्या काळात आपले वजन नियंत्रित करायचे असेल, तर बाजरीचे पीठ आपल्यासाठी उपयुक्त आहे. बाजरी पचनास जड असल्याने, खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते. काहीजण या काळात बाजरीची खिचडी बनवून खातात. जर तुम्हाला गोड खायला आवड असेल, तर आपण खीर बनवून देखील खाऊ शकता.

सिंघाडा

उपवासच्या काळात सिंघाड्याच्या पीठाचे पदार्थ खाल्ले जाते. व्हिटामिन बीने समृद्ध असलेले हे पीठ शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. हा पदार्थ उष्ण प्रभावाचा आहे. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे. कारण त्यामध्ये असलेले फायबर साखरची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. हे पीठ ग्लूटेन फ्री आहे. मॅग्नेशियममध्ये समृद्ध असलेला सिंघाडा शरीराच्या मज्जातंतूंना आराम देते आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते (Healthy flours for good health and immunity during winter).

कॉर्न

ज्या लोकांना अशक्तपणा असतो त्यांना हिवाळ्यातील सामान्य लोकांपेक्षा जास्त थंडी लागते. अशा लोकांनी मक्याच्या पीठाच्या भाकरी खाव्या. मक्यात अ, क, के, बीटा कॅरोटीन आणि सेलेनियम ही जीवनसत्त्वे असतात. मक्याची रोटी आणि मोहरीची भाजी अशक्तपणा असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात.

सोयाबीन

सोयाबीनमध्ये प्रथिने, लोह, फोलेट, मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या दुष्परिणामांशी लढण्यास हे खूप प्रभावी आहे. तसेच हे बर्‍याच आजारांना प्रतिबंधित करते. पण त्यात प्रथिने जास्त प्रमाणात असतात, म्हणून जर यूरिक अॅसिड किंवा थायरॉईडची समस्या असेल, तर अशा लोकांनी सोयाबीनचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.

ज्वारी

आयुर्वेदात असे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीच्या अर्ध्या रोगांचे मूळ हे त्यांचे पोट असते. पोटाच्या समस्या दूर करण्यात ज्वारीच्या पीठाची भाकरी उपयुक्त आहे. जर, आपण नुसत्या ज्वारीची भाकरी खाऊ शकत नसाल, तर गव्हाच्या पिठामध्ये ज्वारीचे पीठ मिसळून, त्याची भाकरी बनवून खाऊ शकता.

(Healthy flours for good health and immunity during winter)

हेही वाचा :

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!