Hair Fall: केस गळतीमुळे त्रस्त आहात? घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून बनवा हा हेअर पॅक!
केस गळण्याचं प्रमाण वाढल्यास केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. अशा वेळी घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तयार केलेला हेअर पॅक केसांची निगा राखण्यासाठी कसा उपयोगी ठरू शकतो, जाणून घेऊया.

त्वचेप्रमाणेच केसांची नियमित काळजी घेणं सुध्दा तितकंच महत्त्वाचं आहे. केसांची योग्य निगा न राखल्यास केस कोरडे होणे, तुटणे आणि केस गळतीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकदा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात केस पडलेले दिसतात, तर केस विंचरताना सुद्धा मोठ्या प्रमाणात केस गळतात. अशावेळी अनेक जण हेअर फॉल कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र, केसांची निगा राखण्यासाठी घरात सहज उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करता येतो. तांदळाचं पाणी, मध, खोबरेल तेल आणि ॲलोवेरा जेल यांपासून घरच्या घरी हेअर मास्क तयार करता येतो. हा मास्क कसा बनवायचा, तो केसांना कसा लावायचा, जाणून घेऊया.
हा घरगुती हेअर मास्क वापरून पाहा
केस गळण्याचं प्रमाण वाढलं असेल, तर केसांची आणि टाळूची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. केस गळताना दिसल्यास अनेक जण बाजारातील विविध हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात. मात्र, घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचाही केसांच्या निगेसाठी उपयोग करता येतो. तांदळाचं पाणी, मध, खोबरेल तेल आणि ॲलोवेरा जेल या चार पदार्थांपासून घरच्या घरी हेअर मास्क तयार करता येतो.
कसा तयार करायचा हेअर मास्क?
हा घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचं पाणी घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार मध, खोबरेल तेल आणि ॲलोवेरा जेल घाला. आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण एकसारखं होण्यासाठी ते चांगलं फेटून घ्या. सर्व पदार्थ एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळल्यानंतर गुळगुळीत मिश्रण तयार होईल. अशा प्रकारे तुमचा घरगुती हेअर मास्क तयार होईल.
केसांना कसा लावायचा हेअर मास्क?
हा हेअर मास्क लावण्यासाठी सर्वप्रथम केसांचे छोटे-छोटे भाग करा. त्यानंतर कॉटन बॉल घेऊन त्याच्या मदतीने मास्क केसांच्या मुळांजवळ आणि टाळूवर लावायला सुरुवात करा. संपूर्ण टाळूवर मिश्रण व्यवस्थित लावून घ्या, जेणेकरून ते सर्व भागांमध्ये पोहोचेल. त्यानंतर बोटांच्या मदतीने टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. हा मास्क केसांवर साधारण ३० मिनिटे राहू द्या. अर्ध्या तासानंतर माइल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.