Induction Cleaning Tips : इंडक्शनवर तेलाचे डाग आणि जळलेले पदार्थ चिकटलेत? ‘ही’ ट्रिक वापरताच होतील स्वच्छ

इंडक्शनवर दूध, तेल किंवा भाजी सांडल्यानंतर डाग सुकून घट्ट चिकटू शकतात. मात्र ते काढताना स्टील स्क्रबर किंवा खडबडीत वस्तू वापरणं टाळा. त्याऐवजी अशा प्रकारे करा डाग स्वच्छ

Induction Cleaning Tips : इंडक्शनवर तेलाचे डाग आणि जळलेले पदार्थ चिकटलेत? ही ट्रिक वापरताच होतील स्वच्छ
induction scrubber
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 5:09 PM

आजकाल स्वयंपाकघरात इंडक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. स्वयंपाक करताना दूध, भाजी किंवा तेल इंडक्शवर सांडल्यामुळे त्यावर डाग पडतात. हे डाग लगेच साफ केले नाहीत तर ते सुकून घट्ट चिकटतात. त्यामुळे अनेकजण ते काढण्यासाठी इंडक्शनवर जोरात स्क्रबर फिरवतात. मात्र, अशी पद्धत इंडक्शनच्या काचेच्या भागावर ओरखडे आणू शकते.

इंडक्शन साफ करण्यासाठी सर्वात आधी ते बंद करून पुर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर मऊ मायक्रोफायबर कापडाने वरच्या भागावरील धूळ आणि अन्नाचे कण हलक्या हाताने पुसून घ्या. यानंतर कापड थोडे ओले करून त्यावर सौम्य डिश सोप किंवा इंडक्शनसाठी योग्य क्लिनर लावा. हे कापड इंडक्शवर हलक्या हाताने फिरवा. डाग काढण्यासाठी जास्त जोर लावण्याची गरज नाही. स्वच्छ केल्यानंतर दुसऱ्या ओल्या कापडाने साबणाचा फेस पुसून घ्या. शेवटी कोरड्या मऊ कापडाने इंडक्शनचा वरचा भाग पुर्णपणे कोरडा करा.

जळलेले किंवा हट्टी डाग

जळलेले किंवा हट्टी डाग सहज निघत नसतील तर इंडक्शन किंवा ग्लास कुकटॉपसाठी वापरता येणारे क्लिनर वापरू शकता. काही पद्धतींमध्ये बेकिंग सोडा आणि पांढऱ्या व्हिनेगरचाही वापर सांगितला जातो. मात्र इंडक्शनच्या कंपनीने दिलेल्या स्वच्छतेच्या सूचना आधी तपासणे महत्त्वाचे आहे.

 

टोकदार वस्तू्ंचा वापर टाळा

इंडक्शन साफ करताना स्टिल स्क्रबर, चाकू किंवा इतर धारदार वस्तू वापरणे टाळा . तसेच खडबडीत पावडर किंवा तीव्र क्लीनर वापरल्यास काचेच्या भागाला नुकसान होऊ शकते. स्वयंपाक झाल्यावर इंडक्शन थंड झाल्यावर लगेच हलक्या हाताने पुसण्याची सवय लावावी. तरच डाग साचणार नाहीत आणि इंडक्शनची चमक कायम राहिल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us