Sai Pallavi : कोणताही मार्ग निवडा पण अभिनय सोडू नका, नाहीतर मी… धनुषच्या राजकारणात प्रवेशांसंबंधी अभिनेत्री साई पल्लवीचं अजब वतव्य
दाक्षिणात्य अभिनेता धनुष याच्या राजकारणात प्रवेश करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. याबाबत अभिनेत्री साई पल्लवीने धनुषला राजकारणात प्रवेश न करण्याबाबत एक विचित्र विनंती केली आहे.

सध्या मनोरंजनविश्वात अभिनेता धनुषच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. धनुष राजकारणात उतरणार का याबाबत वेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच अभिनेत्री साई पल्ल्वीने त्याला एक खास विनंती केली आहे आणि तीची ती विनंती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे ती विनंती जाणून घ्या
धनुष आणि साई पल्लवी लवकरच ओएम : ऑपरेशन मोल या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात साई पल्लवीने धनुषबद्दल ही इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाला येताना रस्त्यावर अनेक राजकीय झेंडे दिसले. त्यामुळे हा एखादा राजकीय मेळावा आहे की काय असं आपल्याला वाटल्याचं ती गंमतीने म्हणाली. यानंतर तिने तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांचा संदर्भ दिला. विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्याप्रमाणे धनुषनेही अभिनय सोडू नये, अशी मी आशा करते असं साई पल्लवी म्हणाली.
धनुषच्या अभिनयाचं कौतुक करताना साई पल्ल्वीने त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकांवर होणार परिणामही सांगितला. त्याच्या वास्तववादी भूमिका आणि तो प्रेक्षकांसमोर आणत असलेल्या कथा दीर्घकाळ लक्षात राहतात. असं तिचं म्हणणं आहे. धनुषच्या पोल्लेाधवन चित्रपटांनंतर अनेकांनी त्यातील नायकाची बाईक घेतली होती. स्टाईल कॉपी केली होती. असं उदाहरणही तिने दिलं.
तुम्ही कोणताही मार्ग निवडा पण कृपया अभिनय सुरू ठेवा. नाहीतर आम्ही एका उत्तम कलाकाराला मुकू, अशी विनंती तिने शेवटी केली.
दरम्यान धनुषच्या राजकारणातील प्रवेशाबाबत सध्या केवळ चर्चा आणि अफवा आहेत. त्याने स्वत: याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘ओएमल ऑपरेशन मोल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार पेरियासी यांनी केलं आहे. या चित्रपटात धनुष एका गुप्त विशेष पथकातील अधिकाऱ्याला भूमिकेत, तर साई पल्लवी आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
