AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cleaning Tips : आरशावरचे पांढरे डाग कसे काढायचे? घरच्या घरी करा हे सोपे उपाय

बाथरूमच्या आरशावर पाण्याचे थेंब सुकल्यानंतर त्यातील खनिजांचे अवशेष राहू शकतात, त्यामुळे पांढरे डाग दिसू लागतात. विशेषतः हार्ड वॉटर असल्यास ही समस्या अधिक जाणवू शकते.

Cleaning Tips : आरशावरचे पांढरे डाग कसे काढायचे? घरच्या घरी करा हे सोपे उपाय
mirror cleaningImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 9:39 PM
Share

बाथरूममधला आरसा कितीही स्वच्छ केला तरी त्यावर पांढरे डाग आणि पाण्याचे निशाणा दिसतात? अनेकदा हे डाग साध्या धुळीमुळे किंवा साबणामुळे नसतात. पाण्याचे थेंब आरशावर सुकल्यानंतर त्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे काचेवर राहतात आणि हळूहळू पांढरे डाग दिसू लागतात. विशेषत:हार्ड वॉटरचा वापर होत असेल तर ही समस्या जास्त जाणवू शकतो

व्हिनेगरचा वापर करा

आरश्यावरचे हलके हार्ड – वॉटर डाग काढण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा वापर केला जातो. व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा. हे मिश्रण थेट आरश्यावर भरपूर फवारण्याऐवजी मायक्रोफायबर कपड्यावर घ्या आणि डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने पुसा.

लिंबाचा वापरही करता येतो

पांढरे डाग खूप जुने नसतील तर लिंबाच्या रसात वापर करण्याचा पर्यायही आहे. लिंबामध्ये असलेल्या आम्लामुळे काही खनिजांचे थर सैल होण्यास मदत होऊ शकते. मात्र आरशाच्या कडा किंवा मागील भागावर द्रव जास्त वेळ राहणार नाही याची काळजी घ्या.

बेकिंग सोडा वापर

खूप हट्टी डागांसाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची हलकी पेस्ट वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आरशावर जोरात घासणे टाळा. जास्त घासल्याने काचेवर ओरखडे पडू शकतात आणि आरशाची चमक होऊ शकते.

आरशावर पाणी साचू देऊ नका

पांढरे डाग पुन्हा पु्न्हा तयार होऊ नयेत यासाठी प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. बाथरूममध्ये अंघोळ करताना आरशावर पाण्याचे थेंब उडाले तर ते सुकण्याआधी मायक्रोफायबर कपड्याने पुसून घ्या. पाणी सुकल्यानंतर त्यातील खनिजे पुन्हा आरशावर जमा होऊ शकतात.

आरसा स्वच्छ करताना ही चूक टाळा

आरश्यावर थेट मोठ्या प्रमाणात पाणी किंवा क्लिनींग लिक्क्विड फवारू नका. विशेषत: आरशाच्या कडांवर द्रव जाऊ दिल्यास मागील reflevtive coating खराब होण्यास धोका असतो. त्यामुळे क्लिनर कपड्यावर घेऊन आरसा पुसणे अधिक सुरक्षित ठरू शकते.

कडक स्क्रबर वापरू नका

पांढरे डाग हट्टी असले तरी स्टील स्क्रबर, खडबडीत स्पंज किंवा ब्लेडने आरसा घासू नका. त्यामुळे डाग जाण्याऐवजी आरशावर ओरखडे पडू शकतात. मऊ मायक्रोफायबर कपडा वापरणे योग्य आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?