AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthcare Tips : रोज साबण लावून अंघोळ करत असाल तर थांबा, अगोदर हे वाचा अन्यथा शरीराचे होईल प्रचंड नुकसान; काय काळजी घ्यावी?

रोज अंघोळ करणं स्वच्छतेसाठी महत्त्वाचं असलं तरी प्रत्येक वेळी संपूर्ण शरीरावर साबण लावणं आवश्यक असेलच असं नाही. तुमची त्वचा, हवामान, घाम आणि रोजची दिनचर्या यानुसार साबणाचा वापर ठरवता येतो.

Healthcare Tips : रोज साबण लावून अंघोळ करत असाल तर थांबा, अगोदर हे वाचा अन्यथा शरीराचे होईल प्रचंड नुकसान; काय काळजी घ्यावी?
bath with soapImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 8:03 PM
Share

अंघोळ हा रोजच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. खास करून गरमीत आपण सारखा घाम आल्यामुळे आपण सारखी अंघोळ करत असतो.काही लोक दिवसातून दोन वेळा अंघोळ करत असतात. पण अंघोळ करताना प्रत्येक वेळी तुम्ही अंगाला जोरजोरात साबणंच चोळताय का? तर सावधान यामुळे त्वचेचे इंफ्केशन वाढू शकते.

प्रत्येक व्यक्तीसाठी अंघोळीची किंवा साबण वापरण्याची एकच ठराविक पद्धत लागू होत नाही. साधारणपणे दिवसातून एकदा अंघोळ करणे स्वच्छतेसाठी पुरेसे असू शकते , मात्र तुमची जीवनशैली हवामान, घाम येण्याचे प्रमाण आणि त्वचेची स्थिती यानुसार त्यात बदल होऊ शकतो.

केव्हा साबणाने अंघोळ करावी

तुम्ही दररोज व्यायाम करत असाल, शरीराला जास्त घाम येत असेल किंवा धूळ मातीच्या वातावरणात काम करत असाल, तर रोज साबणाने अंघोळ करणे अधिक आवश्यक आहे. केवळ दिवसातून एकदाच नव्हे तर दोन वेळा अंघोळ करणे गरजेचे आहे.

जास्त साबणामुळे त्वचा कोरडी होऊ शकते

वारंवार साबण वापरल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी, ताणलेली किंवा खाज येणारी होऊ शकते. खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करणे चांगले मानले जाते.

अंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा

अंघोळ खूप वेळ चालवण्याऐवजी साधारण पाच मिनिटांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शरीराला गरज असेल तेव्हाच साबण वापरा. अंघोळीनंतर टॉवेलने त्वचा जोरात घासू नका, हलक्या हाताने पुसा. त्वचा कोरडी वाटत असल्यास सुगंध नसलेले मॉइश्चरायझर वापरू शकता.

म्हणजेच रोज अंघोळ करणे आणि रोज संपूर्ण शरीरावर साबण लावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमची त्वचा आणि रोजची दिनचर्या लक्षात घेऊन साबणाचा वापर करणे अधिक योग्य ठरू शकते.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...