AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Cleaning Tips : शॉवरमधून पाणी कमी येतंय? पाण्याचा प्रेशर वाढवण्यासाठी करा हे 7 सोप्पे उपाय

शॉवरमधून बारीक धारेने पाणी येत असेल तर प्रत्येक वेळी प्लंबरला बोलावण्याची गरज असेलच असं नाही. शॉवरहेडची घाण, मिनरल्सचा थर किंवा पाइपमधील अडथळा यामागे कारणीभूत असू शकतो.

Home Cleaning Tips : शॉवरमधून पाणी कमी येतंय? पाण्याचा प्रेशर वाढवण्यासाठी करा हे 7 सोप्पे उपाय
home cleaning tipsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 7:07 PM
Share

बाथरूमच्या शॉवरमधून पाणी अगदी बारीक धाराने येत असेल तर अंघोळ करताना चांगलाच त्रास होतो. पण प्रत्येकी वेळी प्लंबरला बोलावण्याची गरज असेलचं असं नाही. शॉवरहेडमध्ये साचलेली घाण, पाण्यातील क्षारांचे थर किंवा पाईपमध्ये आलेला कचरा यामुळेही पाण्याचा प्रेशर कमी होऊ शकतो. अशावेळी हे सोपे उपाय करून पाहा

शॉवरहेडची स्वच्छता करा

शॉवरहेडच्या छोट्या छिद्रांमध्ये घाण किंवा क्षारांचा थर साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे शॉवरहेड नियमितपणे स्वच्छ करा.

व्हिनेगरचा वापर करा

शॉवरहेडवर पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करून मिनरल्सचा थर सैल करता येतो.शॉवरहेड काही काळ व्हिनेगरमध्ये ठेवून नंतर मऊ ब्रशने स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा.

बारीक छिद्र तपासा

शॉवर सुरू केल्यानंतर काही छिद्रांमध्ये पाणी येत नसेल तर त्यामध्ये घाण अडकलेली असू शकते. मऊ ब्रशच्या मदतीने ती हलक्या हाताने साफ करा.

पाइपमध्ये गळती आहे का ती तपासा

शॉवरचा प्रेशर अचानक कमी झाला असेल तर पाईप किंवा जोडांमध्ये गळती आहे. गळती असल्यास पाण्याचा दाब कमी होतो.

इतर नळ तपासा

फक्त शॉवरमधून कमी पाणी येतंय की घरातील इतर नळांचाही प्रेशर कमी आहे का ? ते पाहा सगळीकडे पाण्याचा दाब कमी असल्यास पाइपलाईनमधेच गडबड असू शकते.

वॉटर हिटर पण असू शकतो कारणीभूत

फक्त गरम पाण्याच्या शॉवरचा प्रॉब्लेम असेल तर वॉटर हिटर एकदा तपासून घ्या. कारण हिटरमध्ये पाण्याचे थर साचलेले असू शकतात.

समस्या कायम राहिल्यास प्लंबरला बोलवा

स्वच्छता करूनही पाण्याचा प्रेशर वाढत नसेल, पाईपमध्ये अडथळा किंवा गळतीची शक्यता असल्यास प्लंबरकडून तपासून घ्या.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...