एकदा नक्की ट्राय करा फणसाची निहारी, विसराल चिकन-मटनची चव

फणसासोबत असलेले मसाले, घट्ट ग्रेव्ही या भाजीला टेस्टी बनवतात. ग्रेव्ही घट्ट बनवण्यासाठी यात हरभरा, मशरूम वापरले जाते. ही भाजी तुम्ही रोटी, नान, पराठा किंवा भातासोबतही सर्व्ह करू शकता.

एकदा नक्की ट्राय करा फणसाची निहारी, विसराल चिकन-मटनची चव
jackfruit nihari
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 25, 2026 | 1:57 PM

नेहमीच्या भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. फणसाची निहारी बनवणे थोडे वेळ खाऊ आहे, पण याची चव मेहनत सार्थक ठरवेल. चला तर मग जाणून घ्या चविष्ट फणसाची निहारीची रेसिपी. निहारी म्हटलं की डोळ्यासमोर चिकन किंवा मटण येते. पण तुम्ही शाकाहारी असलात तरी सुद्धा तुम्ही निहारीची चव चाखू शकता. चिकन, मटनच्या ऐवजी तुम्ही यात फणसाच्या फोडी घालून शकता. मसालेदार रस्सा भाजी खाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फणसाची निहारी रेसिपी ट्राय करू शकता.

फणसाची निहारी बनवण्यासाठी साहित्य

  • फणस ५०० ग्रॅम
  • उकळलेले चणे १/४ कप
  • मशरूम १ कप
  • हरभऱ्याचा स्टॉक ४ कप
  • कांदा (चिरलेले) १ १/२ कप
  • आले लसून पेस्ट २ टेबल स्पून
  • हिरवी मिरची ३
  • बेसन १/२ टेबल स्पून
  • गव्हाचे पीठ १ टेबल स्पून
  • मोहरीचे तेल अर्धा कप
  • केवड्याचे पाणी १ टेबलस्पून
  • हळद १ टेबल स्पून
  • लाल तिखट १/२ चमचा
  • तूप २ टेबल स्पून
  • मीठ १ टेबल स्पून
  • धणे
  • जिरं
  • शाही जिरं
  • काळी मिरे
  • दालचिनी
  • स्टार फूल
  • मोठी वेलची
  • हिरवी वेलची
  • लवंग
  • बडीशेप
  • जायफळ
  • तेजपत्ता
  • जावित्री
  • सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या

फणसाची निहारी बनवण्याची कृती

सर्वप्रथम फणसाचे साल काढून लहान तुकडे करून घ्या. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात फणसाचे तुकडे, मीठ, हळद टाका आणि २ ते ३ मिनिटे उकळा. नंतर फणसाचे तुकडे काढून घ्या आणि हे पाणी ग्रेव्हीसाठी बाजूला ठेवा. आता सर्व खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तेजपत्ता, मोठी वेलची, धणे, जिरे, दालचिनी, बडीशेप, लहान वेलची, जायफळ, जायपत्री, लवंग आणि इतर मसाले मलमलच्या कापडात बांधून त्याची एक पोटली बनवा.

आता ग्रेव्ही बनवण्यासाठी उकडलेले चणे आणि मशरूम मिक्सरच्या भांड्यात टाका. यात थोडे चण्याचे पाणी घालून एकत्र करा आणि त्याची बारीक पेस्ट बनवा. आता एका कढईत मोहरीचे तेल गरम करा. त्यात केवड्याचे पाणी घाला आणि तेल उडू नये म्हणून काही मिनिटे झाकून ठेवा. उकडलेल्या फणसाचे तुकडे घाला. साधारण एक मिनिट हलके परतून घ्या. नंतर काढून बाजूला ठेवा. आता त्याच कढईत चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत शिजवा. आता त्यात थोडे चण्याचे पाणी आणि आले-लसूण पेस्ट घालून शिजवा. हिरव्या मिरच्या, मसाल्यांचे मिश्रण, चणा-मशरूमची प्युरी, उरलेले चण्याचे स्टॉक, हळद आणि तिखट घाला. आता यात फणस उकळण्यासाठी वापरलेले पाणी घालून २ ते ३ मिनिटे शिजवा.

आता यात तयार केलेला निहारी मसाला आणि आधीच भाजलेले फणसाचे तुकडे घाला. झाकण ठेवून मंद आचेवर सुमारे १० ते १५ मिनिटे शिजवा. त्यानंतर, ग्रेव्हीमधून फणस काढून गाळून घ्या. आता दुसऱ्या कढईत तूप गरम करा. त्यात गव्हाचे पीठ आणि बेसन घालून काही सेकंद परतून घ्या. गाळलेली ग्रेव्ही घालून चांगले मिक्स करा. आता फणसाचे तुकडे पुन्हा ग्रेव्हीमध्ये टाका. आता थोडे केवड्याचे पाणी, आल्याचे काप, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना आणि थोडा निहारी मसाला घाला. सुमारे एक मिनिटभर शिजवून घ्या. तुमची फणसाची निहारी तयार आहे. आल्याचे काप, हिरवी मिरची, कोथिंबीरचे गार्निश करून गरमा गरम सर्व्ह करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us