AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी ऐकलाय का पेपरमिंट फेस मास्क? एकदम थंड, त्वचेला फायदेशीर, ‘असा’ बनवा!

पुदिना उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देतो. मुलतानी माती आणि दही यांच्या मदतीने पुदिन्याचे फेस मास्क तयार केले जातात. मुलतानी माती चेहऱ्यावरील मुरुम, डाग आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करते.

कधी ऐकलाय का पेपरमिंट फेस मास्क? एकदम थंड, त्वचेला फायदेशीर, 'असा' बनवा!
paper mint maskImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 22, 2023 | 5:04 PM
Share

मुंबई: पुदिना एक वनस्पती आहे जी ताजेपणाने समृद्ध आहे. त्यामुळे पुदिन्यापासून तयार केलेल्या गोष्टी वापरल्यास तुम्हाला खूप ताजेतवाने वाटते. पुदिन्यापासून चटणी खाणे लोकांना सहसा आवडते. पण तुम्हाला हवं असेल तर त्वचेची काळजी घेण्यासाठी पुदिन्याचाही समावेश करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी पुदिना फेस मास्क बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. पुदिना उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देतो. मुलतानी माती आणि दही यांच्या मदतीने पुदिन्याचे फेस मास्क तयार केले जातात. मुलतानी माती चेहऱ्यावरील मुरुम, डाग आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करते. हे आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करते. रोज रात्री हा फेस मास्क लावल्याने त्वचेवर जमा झालेली सर्व धूळ आणि घाण सहज दूर होते, तर चला जाणून घेऊया पुदिना फेस मास्क, पेपरमिंट फेस मास्क कसा बनवावा.

पेपरमिंट फेस मास्क कसा बनवावा?

  • पेपरमिंट फेस मास्क बनवण्यासाठी आधी पुदिन्याची पाने घ्या.
  • नंतर ते चांगले धुवून मिक्सरमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • यानंतर पुदिन्याच्या पानांची पेस्ट एका बाऊलमध्ये ठेवावी.
  • नंतर त्यात दही आणि मुलतानी माती घालून नीट मिक्स करा.
  • आता तुमचा पेपरमिंट फेस मास्क तयार आहे.

पेपरमिंट फेस मास्क कसा लावावा?

  • रात्री पेपरमिंट फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा धुवा.
  • त्यानंतर तयार केलेला मास्क संपूर्ण चेहऱ्यावर चांगला लावा.
  • यानंतर तुम्ही ते चेहऱ्यावर लावा आणि सुमारे अर्धा तास वाळवा.
  • त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • यामुळे तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ होईल.
  • त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डागही दूर होतील.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....