कोरियन ग्लास स्किनसाठी महागड्या प्रोडक्ट्सची गरज नाही, घरीच बनवा राइस टोनर

Korean Glass Skin: सध्या कोरियन ग्लास स्किनचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय आहे. त्वचा हायड्रेटेड आणि ग्लोइंग दिसावी यासाठी महागडी स्किन केअर उत्पादने वापरण्याऐवजी घरच्या घरी राइस टोनर तयार करता येतो. फक्त ३ गोष्टींच्या मदतीने हा टोनर कसा तयार करायचा, जाणून घ्या.

कोरियन ग्लास स्किनसाठी महागड्या प्रोडक्ट्सची गरज नाही, घरीच बनवा राइस टोनर
Rice Toner
| Edited By: | Updated on: Sep 29, 2026 | 4:52 PM

कोरियन स्किन केअरमध्ये त्वचेचे हायड्रेशन आणि ग्लो कायम ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. यासाठी तांदळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तांदळात अँटिऑक्सिडंट्स असतात आणि तो त्वचेसाठी माइल्ड एक्सफोलिएशनमध्ये मदत करू शकतो. त्यामुळे त्वचा अधिक सॉफ्ट, हायड्रेटेड आणि ग्लोइंग दिसण्यास मदत होऊ शकते. पण कोरियन स्किन केअरमधील अनेक उत्पादने महाग असतात.

अशावेळी घरात सहज उपलब्ध असलेल्या तांदळापासून तुम्ही राइस टोनर तयार करून पाहू शकता. हा टोनर तयार करण्याची पद्धतही अगदी सोपी आहे आणि त्यासाठी काही मोजकेच साहित्य लागते. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी राइस टोनर कसा बनवायचा

Loading...

राइस टोनर बनवण्यासाठी काय लागेल?

राइस टोनर तयार करण्यासाठी ३ ते ४ चमचे तांदूळ, ४ ते ५ लवंग आणि काही थेंब शुद्ध, सुगंध नसलेले ग्लिसरीन लागेल. हे टोनर बनवण्यासाठी बासमती तांदळाऐवजी जास्त स्टार्च असलेले साधे जाड तांदूळ वापरावे.

कसा बनवायचा घरच्या घरी राइस टोनर?

हा टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम ३ ते ४ चमचे तांदूळ घेऊन ते दोन वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर तांदूळ एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घाला आणि साधारण एक तास भिजत ठेवा. यामुळे तांदळातील स्टार्च पाण्यात उतरतो. एक तासानंतर तांदूळ गाळून त्याचे पाणी एका स्वच्छ बॉटलमध्ये भरून घ्या. यानंतर या तांदळाच्या पाण्यात ४ ते ५ लवंगा टाका. बॉटल व्यवस्थित हलवा आणि दोन ते तीन तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. त्यानंतर त्यामध्ये काही थेंब ग्लिसरीन मिक्स करा. तुमची त्वचा जास्त ऑइली असेल तर ग्लिसरीनचे प्रमाण कमी ठेवा, तर ड्राय स्किनसाठी याचे प्रमाण थोडे वाढवता येते. सर्व घटक व्यवस्थित मिक्स करण्यासाठी बॉटल नीट हलवा. तयार झालेले टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरा.

कसे वापरावे राइस टोनर?

चेहरा सौम्य क्लिन्झरने स्वच्छ केल्यानंतर स्प्रे बॉटल किंवा कॉटन पॅडच्या मदतीने टोनर चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर प्रेस करा, जेणेकरून टोनर त्वचेत शोषला जाईल. यानंतर मॉइश्चरायझर, सिरम आणि सनस्क्रीन लावून स्किन केअर रुटीन पूर्ण करता येते.

मिळतात हे फायदे

राइस टोनर वापरल्याने त्वचा अधिक सॉफ्ट आणि हायड्रेटेड जाणवू शकते. तांदूळ माइल्ड एक्सफोलिएशनमध्ये मदत करू शकतो, ज्यामुळे त्वचा अधिक ब्राइट आणि ग्लोइंग दिसण्यास मदत होऊ शकते. लवंगेमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही असतात, जे कोणत्याही प्रकारचे पिंपल्स आणि मुरुमांची वाढ रोखण्यास मदत करू शकतात. जर तुमचा चेहरा ड्राय आणि डल वाटत असेल, तर हे टोनर त्याला फ्रेश आणि चमकदार रूप देण्यास मदत करू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us