AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर, गुलाबी आणि मऊ ओठ हवे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी!

ओठांवरील कोरडेपणा इतका वाढतो की अनेकदा ओठांमधून रक्त बाहेर पडू लागते. ओठांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

सुंदर, गुलाबी आणि मऊ ओठ हवे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी!
lip careImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 19, 2023 | 5:42 PM
Share

जर तुम्हालाही सुंदर, गुलाबी आणि मऊ ओठ हवे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बदलत्या ऋतूत ओठ कोरडे. ओठांवरील कोरडेपणा इतका वाढतो की अनेकदा ओठांमधून रक्त बाहेर पडू लागते. या ऋतूत ओठांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. ओठ नेहमी मऊ आणि कोमल ठेवण्यासाठी तुम्हाला काही पद्धतींचा अवलंब करावा लागेल.

1. अधिक पाणी प्या

बदलत्या ऋतूत आपल्या त्वचेसाठी पाणी हा सर्वात मोठा उपचार आहे. कारण पाण्याअभावी तुमची त्वचा आणि ओठ फुटतात. पाणी आपले शरीर हायड्रेटेड ठेवते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते. त्याचबरोबर पाणी आपल्या ओठांचा ओलावा टिकवून ठेवते आणि ते मऊ ठेवते. लक्षात ठेवा की ओठांवर वारंवार जीभ लावू नका, असे केल्याने ओठ अधिक क्रॅक होतात.

2. ओठांसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझर

ज्याप्रमाणे चेहऱ्याच्या त्वचेला उत्तम मॉइश्चरायझरची गरज असते, त्याचप्रमाणे ओठांना उत्तम मॉइश्चरायझरची गरज असते. ओठांमध्ये ओलावा राखण्यासाठी बदाम तेल सीरम किंवा नारळ तेल सीरम वापरा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे सीरम लावू शकता. हे सीरम घरी तयार करण्यासाठी एक चमचा बदामाचे तेल घ्या. आता व्हिटॅमिन सी कॅप्सूल आणि ग्लिसरीनचे काही थेंब घ्या. या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. आता रोज झोपण्यापूर्वी हे सीरम ओठांवर लावा. असे नियमितपणे केल्याने तुमचे ओठ बेबी सॉफ्ट होतील.

3. हे घरगुती मास्क ओठांवर लावा

चेहरा आणि केसांच्या काळजीसाठी मास्क घालता तेव्हा ओठांसाठी मास्क का नाही? लिप मास्क बनवण्यासाठी एक चमचा मध घ्या, त्यात नारळ तेलाचे काही थेंब घाला. चमच्याच्या साहाय्याने ओठांवर लावा आणि ओठ सेलोफिनने झाकून ठेवा. यामुळे मास्क टपकणार नाही आणि ओलावा अबाधित राहील. ओठ जास्त फाटले असतील तर त्यात चिमूटभर हळद घाला. तुम्ही मास्क म्हणून ओठांवर देशी तूप देखील लावू शकता.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा