केसांच्या चांगल्या वाढीसाठी आजच तुमच्या आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

केसांच्या चांगल्या वाढीसाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की तुमच्या आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावे जेणेकरून केसांची वाढ चांगली होईल.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी आजच तुमच्या आहारात समाविष्ट करा हे पदार्थ
Hair care
Image Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 13, 2026 | 2:41 PM

आजकाल केसांच्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. केस कमकुवत होणे, तुटणे, गळणे आणि केसांची वाढ मंदावणे ही अनेकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी केवळ केसांची बाहेरूनच काळजी घेणे पुरेशी नाही. तर शरीराला मिळणाऱ्या पोषक तत्वांचाही केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. केसांच्या वाढीसाठी प्रथिने, लोह, जस्त आणि काही जीवनसत्त्वे यांसारखी पोषक तत्वे आवश्यक असतात. यांच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होऊ शकतात आणि केसगळती वाढू शकते. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

योग्य आणि संतुलित आहारामुळे शरीराला केसांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात . केवळ एकाच पदार्थावर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या आहारात विविध पोषक तत्वांचा समावेश करणे अधिक चांगले आहे. केसांच्या चांगल्या वाढीसाठी आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी हे आपण जाणून घेऊयात.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी या पदार्थांचे तुमच्या आहारात समावेश करा

क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, केसांच्या चांगल्या वाढीसाठी अंडी, मसूर, चणे, सोया, मासे, पालक, अक्रोड, अळशी, चिया सीड्स, संपूर्ण धान्य आणि व्हिटॅमिन सी भरपूर असलेली फळे यांचा आहारात समावेश करावा. अंडी आणि मसूरमधील प्रथिने केस मजबूत करण्यास मदत करतात, कारण केस प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात.

तसेच शरीरात जर लोहाची कमतरता जाणवल्यावरही केस गळू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात डाळी, पालक आणि इतर लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे चांगले आहे. अक्रोड, अळशी आणि चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात, जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरू शकतात. पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए असते, तर आवळा, संत्री आणि व्हिटॅमिन सी असलेली इतर फळे केस मजबूत करण्यास मदत करू शकतात.

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

निरोगी केस टिकवण्यासाठी केवळ आहाराकडे लक्ष देणे पुरेसे नाही. शरीरातील पाण्याची कमतरता टाळा, कारण त्यामुळे स्कॅल्प कोरडी पडू शकते आणि केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. दररोज भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच केसांवर रोज हेअर हिटिंग टूल्सचा वापर करू नका.

अतिरिक्त केमिकल उपचार आणि केस ओढणे किंवा घट्ट बांधणे टाळा. केस गळणे सुरूच राहिल्यास किंवा अचानक वाढल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम. संपूर्ण तपासणी केल्याशिवाय केस वाढवणारी सप्लिमेंट्स घेऊ नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us