Alcohol side effects for Skin : अतिरिक्त मद्यपानाचे त्वचेवर होतात दुष्परिणाम, जाणून घ्या

प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केल्याने शरीरात विषारी तत्व जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे त्वचेला नीट ठेवणार्या शरीरात असलेल्या नैसर्गिक तत्व कमी होतात. अतिमद्यपान केल्याने त्वचेवर अजून काय काय परिणाम होतात हे जाणून घ्या.

Alcohol side effects for Skin : अतिरिक्त मद्यपानाचे त्वचेवर होतात दुष्परिणाम, जाणून घ्या
Skin (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 7:07 AM

मद्यपान शरीरासाठी अपायकारक मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे काय याचा परिणाम थेट त्वचेवरही (Skin Care Routine) होतो. दररोज मद्यपान (Alcohol) केल्याने त्वचा कोरडी आणि सैल होण्याचा धोका वाढतो. जास्त दारू पिण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी पाणी जास्त प्रमाणात प्यावे. अन्यथा त्यांची त्वचा हळूहळू कोरडी व्हायला सुरुवात होते. त्वचा कोरडी झाली की त्यावर लाल पुरळ, लालसरपणा किंवा अन्य परिणाम दिसून येतात. त्वचेवर मुरूम (Pimples) यायला सुरुवात होते असे तज्ज्ञ म्हणतात. हळूहळू त्वचेवर सुरकुत्या यायला सुरुवात होते. असे म्हणतात की, शरीरात विषारी द्रव्य तयार झाल्याने तुम्ही अकाली वृद्धत्वाकडे झुकता. दारू तहान भागवते पण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करते. पाणी कमी पिल्याने चेहरा निस्तेज वाटतो आणि हळूहळू तुम्ही वयस्क दिसू लागता. सुरकुत्या आल्यानंतर तर चेहरा कमी वयातच आपले वलय गमावतो. शरीरातील ओलावा कमी होता. त्यामुळे अतिमद्यपान नकोच.

पिंपल्स :

दारू शरीरातील विषारी द्रव्य वाढवते. यामुळे त्वचेवर मुरूम आणि तोंड यायला यायला सुरुवात होते. दारू पिण्याची सवय शरीरातील पोषक तत्व कमी करतात. जर शरीर आणि त्वचा हेल्दी ठेवायची असेल तर दारू पिणे नकोच.

त्वचेवर लालसरपणा येतो:

बरेचदा काही ड्रिंकचे सेवन केल्याने त्वचेला खूप नुकसान पोचते. यामुळे त्वचेला खाज सुटते. त्वचा लालसर होते. अशा घातक ड्रिंक पिताना तर खूप छान वाटतात. पण यामुळे तुमच्या त्वचेला दीर्घकाळ नुकसान पोचते.

त्वचा सैल होणे :

असे म्हणतात की अतिरिक्त मद्यपान त्वचेला नुकसान पोचवते. याचा सर्वाधिक परिणाम म्हणजे त्वचा सैल होते. एकदा त्वचा सैल झाली की तिला पूर्ववत करण्याचे आव्हान तयार होते. त्यामुळे आपले नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवण्यासाठी दारूपासून दूर राहणे एकदम उत्तम.

इतर बातम्या:

30 January 2022 Panchang | 30 जानेवारी 2022, रविवारचे पंचांग, ​जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Masik Shivratri 2022 | प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी, या संयोगात पूजा केल्यास आयुष्य बदलून जाईल

Alcohol side effects on Skin it can damage your natural skin tone.