Carrot-Ginger Soup : हिवाळ्यात शरीराला द्या उबदार साथ! थंडीच्या दिवसांत घ्या गाजर-आल्याच्या सूपचा आस्वाद
हिवाळ्यात शरीराला उब देणारे आणि चवीला छान असणारे गाजर - आल्याचे सूप घरी अगदी सोप्या पद्धतने बनवता येते. गाजराचा गोडसर स्वाद आणि आल्याचा तिखटसर सुगंध या सुपाची चव आणखी वाढवते.

हिवाळ्यात शरीराला उब देणारे आणि चवीला छान असणारे गाजर - आल्याचे सूप घरी अगदी सोप्या पद्धतने बनवता येते. गाजराचा गोडसर स्वाद आणि आल्याचा तिखटसर सुगंध या सुपाची चव आणखी वाढवते.
साहित्य : 2 मध्यम आकाराची गाजरं, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 पाकळ्या लसूण, 1 छोटा कांदा , 1 चमचा तूप किंवा तेल, 2 कप पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मीरी पूड, थोडी कोथिंबीर
सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून त्यांची साल काढा आणि लहान तुकडे करा. आले, लसूण आणि कांदाही चिरून घ्या.एका पातेल्यात तूप किंवा तेल गरम करून त्यात कांदा, आले आणि लसूण घाला.
कांदा थोडा मऊ झाल्यावर त्यात गाजराचे तुकडे घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. आता त्यात दोन कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
पातेल्यावर झाकण ठेवून गाजर पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
तयार मिश्रण पुन्हा पातेल्यात काढा. गरजेनुसार थोडे पाणी घालून सूपला हवी तशी घट्ट किंवा पातळ करा. त्यात काळी मिरी पूड घालून दोन मिनिटे उकळवा वरून कोथिंबीर घालून गरमागरम सूप सर्व्ह करा.
सूपचे फायदे : गाजरातून बीटा - कॅरेटिन मिळते. जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होते. आपल्यामुळे सूपला छान चव आणि सुगंध मिळतो. गरम सूप थंडीच्या दिवसांत शरीराला उबदारपणा देते. हे सूप हलके असून भाज्यांचा आहारात समावेश चांगला पर्याय आहे.