‘या’ सोप्या किचन टिप्स फॉलो केल्यास पोळ्या राहतील अनेक तास मऊ

गरमागरम आणि मऊ पोळ्या प्रत्येकाला खायला आवडतात. पण कधी कधी पोळ्या बनवल्यानंतर काही वेळाने त्या कडक होतात. चला तर मग आजच्या लेखात आपण पोळ्या अनेक तास मऊ आणि ताज्या ठेवण्यासाठी काही सोप्या किचन टिप्स जाणून घेऊयात.

या सोप्या किचन टिप्स फॉलो केल्यास पोळ्या राहतील अनेक तास मऊ
Chapatis
| Edited By: | Updated on: Jul 14, 2026 | 4:16 PM

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये रोज सकाळी डब्बा तसेच नाश्त्यात पोळी बनवली जातेच. त्याचबरोबर रोजच्या जेवणात पोळी असते. जवळजवळ प्रत्येक घरात दिवसातून एकदा किंवा दोनदा पोळ्या बनवल्या जातात. गरम आणि मऊ पोळीमुळे जेवणाची चव वाढते, पण कधीकधी बनवल्यानंतर लगेचच त्या कडक होतात. याचा परिणाम त्यांच्या चवीवर आणि पोतावर होतो, विशेषतः दुपारच्या जेवणासाठी किंवा प्रवासासाठी डब्यात नेताना पोळ्या कडक होणे.

पोळ्या लवकर कडक होण्याची अनेक कारणे आहेत. पीठ चुकीच्या पद्धतीने मळणे, भाजण्यासाठी अपुरा वेळ, जास्त वेळ भाजणे किंवा जास्त उष्णता, ओलावा कमी होणे आणि नीट पद्धतीने न ठेवणे ही मुख्य कारणे मानली जातात. शिवाय पोळ्या जास्त वेळ उघड्या ठेवल्यानेही त्यातील ओलावा कमी होतो आणि त्या लवकर सुकतात. चला पोळ्या जास्त वेळ मऊ ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स आणि त्या बनवताना कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊयात.

Loading...

पोळ्या जास्त वेळ मऊ ठेवण्यासाठी या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

पीठ व्यवस्थित मळा

पोळीचे पीठ नेहमी ताजेच मळून घ्या आणि गरजेनुसार पाणी टाका. पीठ फार घट्ट किंवा फार सैल नसावे. हवे असल्यास, पीठ मळताना थोडे दूध, दही किंवा एक चमचा तेल टाका. यामुळे पोळ्या अधिक मऊ होतात आणि जास्त वेळ मऊ राहण्यास मदत होते.

पिठाचा गोळा काही वेळ झाकून ठेवा

पीठ मळून झाल्यावर ते झाकून 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवा. यामुळे पीठ व्यवस्थित घट्ट होते आणि त्यातील ओलावा टिकून राहतो. या पिठापासून बनवलेल्या पोळ्या मऊ होतात आणि लवकर कडक होत नाहीत.

योग्य तापमानावर पोळी भाजा

पोळी नेहमी मध्यम आचेवर, चांगली तापलेल्या तव्यावरच भाजा. जास्त तापल्याने पोळी पटकन करपू शकते आणि मंद आचेवर जास्त वेळ भाजल्यास ती कोरडी होऊ शकते. योग्य तापमानावर भाजलेल्या पोळ्या मऊ आणि च‍विष्ट लागतात.

पोळीवर थोडे तूप किंवा लोणी लावा

पोळी तव्यावरून काढल्याबरोबर तिला तूप किंवा बटर हलकासा लावा. यामुळे पोळी मधील ओलावा टिकून राहतो आणि पोळी जास्त वेळ मऊ राहते. जर तुम्हाला कमी फॅटचा पर्याय हवा असेल, तर तुम्ही पोळीला तुप, तेल व लोणी लावू नका.

पोळ्या हॉट केस किंवा कापडात गुंडाळून ठेवा

पोळ्या तयार झाल्यावर त्यांना एका स्वच्छ सुती कापडात गुंडाळून हॉट केसच्या डब्यात किंवा झाकण असलेल्या भांड्यात ठेवा. यामुळे त्यांची उष्णता आणि ओलावा टिकून राहील. पोळ्या जास्त वेळ उघड्या ठेवल्यास त्या सुकतात आणि कडक होतात.

पोळ्या बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

पोळ्या बनवण्यासाठी चांगल्या प्रतीचे पीठ वापरा आणि ते ताजेच मळा. पीठ मळताना जास्त कोरडे किंवा पातळ मळणे टाळा. पोळ्या लाटताना जास्त कोरडे पीठ वापरणे टाळा, कारण त्यामुळे पोळ्या कोरड्या होऊ शकतात.

तवा पूर्णपणे गरम झाल्यावरच पोळ्या भाजा आणि गरजेपेक्षा जास्त वेळ आचेवर ठेवू नका. पोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, भाजल्यानंतर लगेच त्या झाकून ठेवा. दुपारच्या जेवणासाठी पोळ्या बनवत असाल, तर त्या पूर्णपणे थंड होण्यापूर्वी गरम डब्यात किंवा स्वच्छ सुती कापडात ठेवा. यामुळे त्या जास्त काळ मऊ राहतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us