Kojagiri Purnima Recipe: कोजागिरी पौर्णिमा होईल आणखी खास, ट्राय करा मसाला दुधाची ही खास रेसिपी

Masala Doodh Recipe: कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध आवर्जून बनवले जाते. तुम्ही सुद्धा मसाला दूध बनवणार असाल तर ही खास रेसिपी नक्की ट्राय करा.

Kojagiri Purnima Recipe: कोजागिरी पौर्णिमा होईल आणखी खास, ट्राय करा मसाला दुधाची ही खास रेसिपी
Kojagiri Purnima 2026
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 24, 2026 | 3:39 PM

कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की पहिले विचार येतो तो मसाला दूध. त्याशिवाय हा सण अपूर्ण आहे. कोजागिरीला प्रत्येक घरी मसाला दूध बनवले जाते आणि रात्री हे दूध पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते. कोजागिरीला पडणारा चंद्राचा प्रकाश आणि छाया शरीरासाठी आणि आरोग्यासाठी फार चांगले असते असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक लोक कोजागिरीची रात्र जागून घालवतात. रात्री चंद्र प्रकाशात गरमा गरम मसाला दूध पिऊन सणाची मजा द्विगुणीत होते. यावर्षी रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे. तुम्ही सुद्धा कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवणार असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

मसाला दूध बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

– ४ कप दूध
– १/२ कप साखर
– १०-१२ पिस्ता
– १०-१२ बदाम
– १/४ टीस्पून जायफळ पावडर
– ३/४ टीस्पून वेलची पूड
– २ टेबल स्पून दुधाची साय (फ्रेश क्रीम)
– २ टीस्पून गुलाब जल
– चिमूटभर केसर

Loading...

मसाला दूध बनवण्याची पद्धत

मसाला दूध बनवण्यासाठी प्रथम एका जाड तळाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा. दुधाला चांगली उकळी येऊ द्या. यात साय तयार होऊ नये म्हणून एक उकळी आल्यावर यात चमचा फिरवा. आता यात साखर टाकून मिक्स करा. दूधात साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगली उकळी येऊ द्या. अध्ये मध्ये चमच्याने ढवळत राहा. आता यात चिमूटभर केसर कुस्करून टाका. हे मिक्स केल्यावर यात जायफळ पावडर टाका. नंतर वेलची पावडर घाला. हे चांगले मिक्स करा. आता पिस्ता आणि बादाम बारीक करून घ्या. लक्षात ठेवा ते थोडेसे जाडसर असले पाहिजे. तुम्ही त्याचे बारीक काप सुद्धा करू शकता. आता हे बदाम आणि पिस्ताचे मिश्रण दूधात घाला. यात २ चमचे दुधाची साय आणि गुलाब जल टाका. याला चांगली उकळी येऊ द्या. तुमचे मसाला दूध तयार आहे. हे ग्लासमध्ये काढा आणि त्यावर पिस्ता, केशरच्या काड्यांनी गार्निश करा आणि गरमा गरम सर्व्ह करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us