वेलचीला समजू नका केवळ माउथ फ्रेशनर! रोज चघळल्याने मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बहुतेक लोक जेवण झाल्यानंतर वेलची खातात. पण वेलची ही फक्त माउथ फ्रेशनर नाहीये तर तिचे अनेक फायदे आहे. खरं तर वेलची अनेक गुणधर्मांणी परिपूर्ण आहे. जाणून घ्या वेलची खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे मिळतात.

वेलचीला समजू नका केवळ माउथ फ्रेशनर! रोज चघळल्याने मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
cardamom
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Sep 26, 2026 | 9:46 PM

स्वयंपाकघरात हिरव्या वेलचीला एक विशेष स्थान आहे. तिच्या अनोख्या सुगंधामुळे मसालेदार पदार्थ आणि गोड पदार्थांमध्ये तिचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वेलची केवळ एक मसाला नाही. तर ते अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. वेलचीमध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात. अनेक लोक श्वासाच्या ताजेपणासाठी वेलची चघळतात, पण तिचे फायदे त्यापलीकडेही आहेत. ती अनेक आरोग्य समस्या सोडवण्यासही मदत करू शकते. चला तर मग जाणून घेऊया वेलची खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पचनक्रिया सुधारते

वेलचीचे तेल पोटातील पाचक रस आणि पाचक एन्झाइम्सच्या निर्मितीला चालना देते. यामुळे आम्लपित्त, पोट फुगणे आणि गॅस लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते, ज्यामुळे अन्न अधिक सहजतेने पचण्यास मदत होते.

ओरल हेल्थ सुधारते

वेलची केवळ मुखशुद्धीच करत नाही, तर तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. कारण तिच्यामध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे जीवाणूंची वाढ रोखतात आणि तोंडाची दुर्गंधी टाळतात. तसेच ती हिरड्यांचे संक्रमण आणि दातांच्या किडीपासूनही संरक्षण करते.

हृदयाचे आरोग्य राहते चांगले

वेलचीचा आणखी एक फायदा म्हणजे ती हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास मदत करते. म्हणजेच हृदय निरोगी ठेवण्यास साहाय्य करते. वेलचीचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते. यातील नैसर्गिक संयुगे हृदयाच्या आरोग्याला आधार देऊ शकतात.

रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त

वेलचीमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आणि डायरयूटिक गुणधर्म असतात, जे रक्तवाहिन्या शिथिल करून रक्ताभिसरण सुधारतात आणि उच्च रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करू शकतात. पण औषध म्हणून तिची प्रमुख भूमिका नसते.

दाह कमी करण्यास मदत

वेलचीमध्ये दाहविरोधी गुणधर्म असलेली काही संयुगे आढळतात. ही संयुगे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे वेलचीचा संतुलित आहारातील समावेश उपयुक्त ठरू शकतो. मात्र, कोणत्याही आजारावरील उपचार म्हणून तिचा वापर करू नये.

रक्तातील साखरेवर परिणाम

काही संशोधनानुसार वेलची रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते. यातील काही नैसर्गिक घटकांचा चयापचयावर परिणाम होऊ शकतो. मात्र, याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. मधुमेह असल्यास औषधांऐवजी केवळ वेलचीवर अवलंबून राहू नये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us