AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मखना आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ, कसा? वाचा…

मखन्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून तुन्ही खाऊ शकता. त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतील. मखण्यात ड्रायफ्रुट मिक्स करून तुम्ही एक चांगला पदार्थ बनवू शकता...

मखना आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ, कसा? वाचा...
मखना
| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 8:55 AM
Share

मुंबई : मखाना(Makhana) हेल्दी आणि टेस्टी. मखना जितका आरोग्यासाठी चांगला तितकाच चवदार … मखन्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून तुन्ही खाऊ शकता. त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतील. मखण्यात ड्रायफ्रु(Dry fruit) मिक्स करून तुम्ही एक चांगला पदार्थ बनवू शकता. उपवासासाठी हा उत्तम नाश्ता आहे. मसाले आणि सुका मेवा यांचं मिश्रण तुम्हाला एक खास चव देईल. ज्यामुळे तुम्हाला तृप्त झाल्याचा आनंदही मिळेल. लहान मुलांसाठीही हा एक चांगला नाश्ता आहे. मखना अतिशय पौष्टिक असतो. त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असतात. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहेत. मखन्यात एंटी-एजिंग एंजाइमों गुणधर्म देखील आहेत . प्रथिनेसुद्धा आहेत. हे ग्लूटेन फ्री आहेत. संध्याकाळी एखादं पुस्तक वाचताना एक कप गरम चहासोबत तुम्ही मखान्यापासून बनवलेला हा नाश्ता घेऊ शकता . तुम्हाला नक्की आवडेल. चला जाणून घेऊया या पदार्थाची रेसिपी…

साहित्य-

200 ग्रॅम मखना

चवीनुसार मीठ

1/2 कप मिक्स ड्रायफ्रुट

1 टीस्पून चाट मसाला

1/4 टीस्पून पांढरी मिरी पावडर

1/2 टीस्पून जिरे पावडर

2 चमचे तूप

मखाना स्नॅक्स बनवायची कृती

1. मखाना स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम ड्रायफ्रुट्स घ्या. ते बारीक चिरून घ्या. आता कढई गॅसवर ठेवून त्यात तूप गरम करा.

२. तूप चांगलं गरम झालं की त्यात मखणा टाका आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत तळा. मखना एका मोठ्या भांड्यात काढा. आता कढईत आणखी तूप गरम करा. कढईत चिरलेले काजू घाला आणि ते सोनेरी होईपर्यंत तळा. नंतर त्याच भांड्यात काढा.

3. मखना आणि ड्रायफ्रुट्स एकत्र करून त्यात जिरेपूड, काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका. सगळं चांगलं मिसळा आणि तुमचा मखाना स्नॅक्स तयार…

मखन्याचे आरोग्यसाठीचे फायदे मखन्यात आवश्यक पोषक तत्वे भरपूर असतात. त्यात मॅंगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थायामिन, प्रथिने आणि फॉस्फरस असतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ते किडनीचे आरोग्य राखण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास, यकृताला डिटॉक्सिफाई करण्यास, हाडे मजबूत करण्यास, वजन कमी करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या

Skin Care Tips : चमकदार त्वचेसाठी हे घरगुती डिटॉक्स पेय प्या आणि सुंदर त्वचा मिळवा!

गरोदर महिलांनी रंगपंचमीमध्ये ‘हा’ मोह टाळावा… अशी घ्या स्वतःची काळजी

‘या’ 10 सवयी तुमची किडनी खराब करतील, वेळीच व्हा सावध!

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...