पपईचा केसांना काय फायदा? कशी असते घरगुती पपई हेअर ट्रीटमेंट?

आज आम्ही तुमच्यासाठी पपई हेअर ट्रीटमेंट घेऊन आलो आहोत. पपई Vitamin C, A, मॅग्नेशियम आणि तांब्याचा चांगला स्रोत आहे, जे आपल्या केसांना बरेच फायदे देते. इतकंच नाही तर पपईमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म देखील असतात.

पपईचा केसांना काय फायदा? कशी असते घरगुती पपई हेअर ट्रीटमेंट?
papaya benefits
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 1:55 PM

पपई हे एक असे फळ आहे जे आपल्या आरोग्यासाठी तसेच केसांसाठी फायदेशीर आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन-ए असते जे केसांच्या मुळांमध्ये सीबम तयार करण्यास मदत करते. सीबम आपला कोरडेपणा कमी करू शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी पपई हेअर ट्रीटमेंट घेऊन आलो आहोत. पपई Vitamin C, A, मॅग्नेशियम आणि तांब्याचा चांगला स्रोत आहे, जे आपल्या केसांना बरेच फायदे देते. इतकंच नाही तर पपईमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म देखील असतात, जे आपल्या टाळूतील इन्फेक्शन दूर करण्यात उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर पपईमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप चांगले असते, त्यामुळे ते तुमच्या केसांना अंतर्गत पोषण पुरवते, ज्यामुळे तुमचे केस लांब, मजबूत आणि मुलायम होतात, तर चला जाणून घेऊया पपई हेअर ट्रीटमेंट कशी असते, त्याचा हेअर मास्क कसा बनवावा.

पपई हेअर मास्क बनवण्यासाठी साहित्य

  • मॅश केलेले पपई 1 वाटी
  • कोरफड जेल 1 चमचा
  • कच्चे दूध 1 कप
  • व्हिटॅमिन-ई कॅप्सूल 1

पपई हेअर मास्क कसा बनवावा

  • पपईच्या हेअर ट्रीटमेंटसाठी तुम्ही सर्वप्रथम मॅश केलेली पपई घ्या.
  • नंतर ते चांगले मॅश करून एका बाऊलमध्ये ठेवा.
  • यानंतर एक कप कच्चे दूध आणि कोरफड जेल त्यात घाला.
  • मग त्यात व्हिटॅमिन-ई कॅप्सूल टाका
  • यानंतर या सर्व गोष्टी नीट मिक्स करा.
  • आता तुमचे पपई हेअर मास्क तयार आहे.

ट्रीटमेंटच्या स्टेप्स

  • पपई हेअर मास्क लावण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवा आणि थोडे थंड करा.
  • या दरम्यान शॅम्पूने केस धुवून स्वच्छ करावेत. तेलकट केसांवर त्याचा परिणाम होत नाही.
  • त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने टाळू आणि केसांच्या लांबीमध्ये ते चांगले लावा.
  • यानंतर तुम्ही तुमच्या दोन्ही हातांच्या मदतीने हा पॅक केसांमध्ये लावा.
  • केसांमध्ये कमीतकमी 30-40 मिनिटे ठेवा.
  • यानंतर पाण्याच्या साहाय्याने केस धुवून स्वच्छ करा.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.