टीव्ही-फ्रीज घेण्यापूर्वी इकडे लक्ष द्या!

टीव्ही-फ्रीज घेण्यापूर्वी इकडे लक्ष द्या!

प्रशांत लीला रामदास, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली:  नवीन फ्रीज किंवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी  चिंतेची बातमी आहे.कारण बहुतांश इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ही दरवाढ तात्पुरती रोखली होती,  पण आता या वस्तूंच्या किमती 10 टक्क्यांपर्यत वाढण्याची शक्यता आहे.  येत्या काळात सर्वसामान्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू किमती 3 ते 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे.

टीव्ही आणि इतर वस्तूच्या किमतीत जवळपास 10 टक्के वाढण्याचे संकेत आहेत. रुपयाची घसरण आणि काही वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दरवाढ होऊ शकते. बॉश, सिमेंस, हायर आणि बीपीएल यासारख्या ब्रँडच्या किमती वाढण्याची चिन्हं आहेत.

वस्तूत: गेल्या महिन्यातच ही दरवाढ होणार होती. मात्र, सणासुदीचा काळ असल्याने ती तात्पुरती पुढे ढकलण्यात आली. एलजी, सॅमसंग आणि सोनी या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवरील 10 टक्केपर्यंतच्या डिस्काऊंटसाठी दिली जाणारी सबसिडी मागे घेतली आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री सणासुदीला अधिक असते. त्यामुळे तात्पुरता का होईना ग्राहकांना त्यामुळे दिलासा मिळाला. पण आता दरवाढ करण्याची तयारी अनेक कंपन्यांनी केल्याचे दिसते. मात्र कंपन्यांच्या या धोरणामुळे व्यापारी अडचणीत येतो. कंपनीने दर वाढविले की त्याच्याशी संबंधित इतर वस्तूचेही दर वाढतात,

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांना या ना त्या प्रकारे बसतच आहे. दैनंदिन साहित्यासह गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची होत असलेल्या संभाव्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांनाच बसणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *