भावा, मायलेज मिळत नसतो, काढावा लागतो! जाणून घ्या, गाडीचा मायलेज कसा वाढवायचा?

| Updated on: Apr 29, 2022 | 12:38 PM

कारला मायलेज मिळत नसल्याने अनेक जण त्रस्त आहेत. एकीकडे इंधनाचे दर वाढत असताना दुसरीकडे वाहन अपेक्षीत मायलेज देत नसल्याने लोकांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे या लेखात चांगला मायलेज मिळविण्यासाठीच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

भावा, मायलेज मिळत नसतो, काढावा लागतो! जाणून घ्या, गाडीचा मायलेज कसा वाढवायचा?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

प्रत्येकाची इच्छा असते, की आपल्या कारने चांगला मायलेज (mileage) दिला पाहिजे. वाढत्या इंधनाच्या दरांमुळे गाड्यांच्या मायलेजलाही अतिशय महत्व निर्माण झालेले आहे. कुठलेही वाहन खरेदी करताना लोक मायलेजचाही आवर्जून विचार करीत असतात. चांगल्या मायलेजच्या वाहनांची निवड केली जाते. अनेक कार निर्मात्या कंपन्या मायलेजच्या दाव्यांसाठी एआरआयच्या (ARI) संख्येचा दाखला देत असतात. परंतु खरे सांगायचे झाल्यास असा मायलेज सहजासहजी मिळत नाही. परंतु काही टीप्सच्या (tips) माध्यमातून तुम्ही तुमच्या कारचा मायलेज वाढवू शकतात. आज या लेखातून कारचा मायलेज वाढविण्याच्या काही टीप्सची माहिती घेणार आहोत.

गरजेनुसार एसीचा वापर करा

जर तुम्ही नियमित स्वरुपात ड्राईव्हींग करताना एसीचा वापर करत असाल तर, चांगल्या मायलेजसाठी तुम्हाला ही सवय बदलावी लागेल. एसीच्या वापरामुळे कारचा मायलेज 30 टक्क्यांपर्यंत कमी होउ शकतो. एका रिपोर्टनुसार, जर तुम्ही फुल टँक फ्यूअलसोबत एसीचा वापर करुन 500 किमीचा प्रवास करीत असाल तर, एसटी बंद करुन तोच प्रवास तुम्ही 600 ते 625 किमीपर्यंत कराल.

खिडकी बंद ठेवावी

प्रवासादरम्यान, खिडकी उघडी असेल तर, यातून कारच्या एअरोडायनमिक्समध्ये गडबड निर्माण होउ शकते. त्यामुळे इंधनाचा जास्त वापर होउ शकतो. जर तुमच्या कारचा वेग 50 किमी प्रतितास आहे, आणि खिडकी उघडी आहे तर अशात कारचा मायलेज कमी होउ शकतो. त्यामुळे खिडकी उघडण्यापेक्षा तुम्ही फ्रेश एअर सेटींगच्या माध्यमातून एअर ब्लोअरचा वापर करु शकतात.

सर्व्हिसिंगकडे लक्ष ठेवा

कारची नियमित सर्व्हिसिंग गरजेची आहे. कारची नियमित पध्दतीने देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे कारच्या संपूर्ण क्षमतेवर याचा परिणाम होउ शकतो. एअर फिल्टर, फ्यूअल फिल्टर कारच्या मायलेज वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाचे घटक असतात. जर एअर फिल्टर चॉक झाले असेल तर इंजीनमध्ये घाण हवेचा प्रवाह जातो. त्यामुळे इंधन जास्त लागत असते.

टाकीत जास्त इंधन नको

जर तुमच्या कारमध्ये जास्त इंधन भरलेले असेल तर अशा वेळी तुम्हाला कमी मायलेज मिळू शकतो. कारवर जितका जास्त लोड असतो, इंधनाचा वापरदेखील तितकाच जास्त होत असतो. त्यामुळे गरजेनुसारच इंधन गाडीत भरले पाहिजे. दुसरीकडे, कमी इंधन असल्यास फ्यूअल पंपवरही जास्त लोड निर्माण होत असतो. त्यामुळे ही तारेवरील कसरत करताना अनेकदा तारांबळ उडत असते.

वारंवार ब्रेक घेणे टाळा

प्रवासादरम्यान, रस्ता माहिती असेल तर न थांबता सलग वाहन चालवून यातून चांगला मायलेज मिळवता येतो. परंतु वारंवार ब्रेक घेत प्रवास केल्यास यातून मायलेज कमी होत असतो. त्यामुळे गरज नसताना प्रवासात ब्रेक घेणे टाळले पाहिजे. सलग प्रवास केल्यास मायलेज चांगला मिळतो.

Government Jobs : जास्त गुण मिळालेल्या ‘ओबीसींना’ मिळणार आता ‘ओपन’ची जागा ! आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bala Nandgaonkar : औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला, मग एमआयएमचा खासदार का निवडून येतो? बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला सवाल

Beauty Tips: उन्हाळ्यातही त्वचा, केस चमकदार ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!