कडक उन्हातही भाज्या होणार नाहीत खराब, FSSAI ने सांगितल्या ‘या’ स्मार्ट ट्रिक्स

उन्हाळ्यात भाज्या बऱ्याच दिवस टिकवून ठेवणे हे एक आव्हान ठरू शकते. कारण या दिवसात भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्‍याने आर्द्रतेमुळे खराब होतात. तर अशावेळेस भाज्या चांगल्या राहाव्या यासाठी FSSAI ने या काही स्मार्ट ट्रिक्स सांगितल्या आहेत. या ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात

कडक उन्हातही भाज्या होणार नाहीत खराब, FSSAI ने सांगितल्या या स्मार्ट ट्रिक्स
भाज्या
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 26, 2026 | 12:46 PM

उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढल्याने आणि उच्च आर्द्रतेमुळे घरातील भाज्या लवकर खराब होतात आणि त्यावर बुरशीची वाढही वेगाने होते. त्यामुळे या दिवसात शिजवलेले अन्न योग्य प्रकारे नीट न ठेवल्याने खराब होतात. त्यातच कच्च्या भाज्यासुद्धा योग्य प्रकारे न साठवल्यास लवकर खराब होतात. विशेषतः हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. भाज्या योग्य तापमानात साठवण्याव्यतिरिक्त त्या फ्रिजमध्ये ठेवताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे भाज्या दीर्घकाळ ताज्या राहतील. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) भाजीपाला साठवण्याबाबत एक सूचना जारी केली आहे. यामुळे भाजीपाला अधिक दिवस ताज्या राहण्यास आणि खराब होण्यापासून वाचण्यास मदत होईल. तसेच यामुळे त्यातील पोषक तत्वेही अधिक काळ टिकून राहतात. चला तर मग उन्हाळ्यात भाजीपाला कसा साठवायचा ते जाणून घेऊयात.

भाज्या स्वच्छ करणे

हिरव्या भाज्या बऱ्याच दिवस चांगल्या ठेवण्यासाठी तुम्ही त्या प्रथम स्वच्छ कराव्यात. सर्व भाज्या पूर्णपणे धुणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यावरील घाण आणि जीवाणू निघून जातील. असे न केल्यास भाज्या लवकर खराब होऊ शकतात. त्यानंतर, भाज्यांमधील पाणी पुर्णपणे काढून टाका यासाठी तुम्ही त्यांना कॉटनच्या कापडावर पसरवून त्यातील पाणी काढू शकता.

पेपर टॉवेलचा करा वापरा

दुसरी स्टेप म्हणजे हिरव्या भाज्या एका स्वच्छ पेपर टॉवेलमध्ये गुंडाळणे. हा कागद त्यांना रेफ्रिजरेटरमधील आर्द्रतेपासून वाचवेल आणि थंड ठेवेल. भाज्या कोणत्याही वर्तमानपत्र किंवा इतर कोणत्याही प्रकारचा छापलेला किंवा रंगीत कागदात ठेवणे टाळा हे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे रंग आणि शाईमधील केमिकल भाज्यांमध्ये मिक्स होऊ शकतात, जे आरोग्यासाठी ठरेल.

ही पद्धत देखील प्रभावी आहे

लोक अनेकदा भाज्या बाजारातून आणल्या की त्या प्लास्टिकची पिशवी थेट फ्रिजमध्ये ठेवतात. यामुळे भाज्यांना हवा मिळत नाही आणि त्या लवकर खराब होतात. तुम्ही भाजी ठेवण्याच्या जाळी मिळते ते वापरू शकता किंवा वेगळी पिशवी वापरू शकता.

भाज्या साठवण्यासाठी बोनस टिप्स

  • हिरव्या भाज्या धुतल्यानंतर त्या टॉवेलने पूर्णपणे कोरड्या करा आणि ओलाव्यापासून दूर ठेवा.
  • भाज्या वेगवेगळ्या रॅकमध्ये ठेवाव्यात हे लक्षात ठेवा, कारण एक जरी भाजी खराब झाली तरी बाकीच्या भाज्याही लवकर खराब होतात.
  • टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे, ते फक्त दमटपणा नसलेल्या थंड ठिकाणी ठेवावेत.
  • कांदे आणि बटाटे या भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नका, थंडाव्यामुळे त्यांना लवकर कोंब येऊ शकतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us