AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या, जाड, सुंदर भुवया हव्या आहेत? मग झोपताना फक्त व्हॅसलीन लावा; एका आठवड्यात फरक दिसेल, वापरण्याची योग्य पद्धत काय?

सुंदर, जाड भुवयांसाठी व्हॅसलीन हा एक प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय आहे. हे भुव्यांच्या मुळांना पोषण देऊन केसांच्या वाढीस मदत करते. हा सुरक्षित आणि स्वस्त उपाय महागड्या उपचारांना उत्तम पर्याय आहे. व्हॅसलीन वापरण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊयात.

काळ्या, जाड, सुंदर भुवया हव्या आहेत? मग झोपताना फक्त व्हॅसलीन लावा; एका आठवड्यात फरक दिसेल, वापरण्याची योग्य पद्धत काय?
Vaseline apply on eyebrows - photoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 8:24 PM
Share

सुंदर दिसायला कोणाला नाही आवडणार? त्यासाठी सगळेचजण किती तरी प्रकारे आपल्या चेहऱ्याची, त्वचेची काळजी घेत असतात. त्यात आता कितीतरी महागड्या ट्रिटमेंट निघाल्या आहेत. अनेक मुलींना आता त्यांच्या भुवया जाड ठेवायला आवडतात. भुवया याचेहऱ्याच्या सौंदर्यात आणि भावनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. जाड, स्पष्ट आणि नीटनेटक्या भुवया तुमच्या चेहऱ्याला एक तेजस्वी लूक देतात आणि तुमचे डोळे आकर्षक बनवतात. त्यामुळे जाड भुवया ठेवण्याचा ट्रेंडही आता फार चर्चेत आहे. त्यासाठी केमिकल अन् महागड्या ट्रिटमेंट घेतात. पण ज्यांना हे पर्याय नाही आवडत ते घरगुती उपायांकडे वळतात. असाच एक घरगुती उपाय आहे जो सध्या फार चर्चेत आहे. तो उपाय म्हणजे व्हॅसलीन.

सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय

व्हॅसलीन हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. व्हॅसलीनमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत जे भुव्यांच्या मुळांना पोषण देतात आणि नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ते वापरणे खूप सोपे आहे आणि घरी करता येते. तर, भुवया वाढवण्यासाठी तुम्ही व्हॅसलीन कसे वापरू शकता ते जाणून घेऊया.

व्हॅसलीन वापरण्याची योग्य पद्धत:

प्रथम, तुमचा चेहरा आणि भुवया पूर्णपणे स्वच्छ करा. तुमच्या भुवया मेकअप, घाण किंवा तेलापासून मुक्त आहेत याची खात्री करा. नंतर, थोडेसे व्हॅसलीन घ्या आणि ते तुमच्या भुवयांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. ते दिवसातून दोनदा लावा , सकाळी आणि झोपण्यापूर्वी. रात्री व्हॅसलीन लावणे सर्वात फायदेशीर आहे, कारण झोपेच्या वेळी केसांची वाढ जलद होते. तुम्ही व्हॅसलीनमध्ये नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल देखील मिसळू शकता.

हा उपाय नियमित केला तर भुवयांमध्ये लक्षणीय फरक दिसून येईल. काहींना फक्त एका आठवड्यात फरक दिसू शकतो, परंतु योग्य वापराने, परिणाम दीर्घकाळ टिकतात. या काळात भुवया खाजवणे, ओढणे किंवा घासणे टाळा, कारण यामुळे केस कमकुवत होऊ शकतात आणि वाढ रोखली जाऊ शकते.

व्हॅसलीनचे फायदे:

भुवया जाड बनवते. भुवयांची मुळे मजबूत होतात. त्वचा हायड्रेटेड राहते, कोरडेपणा किंवा खाज सुटत नाही. हा एक घरगुती उपाय आहे, सुरक्षित आणि स्वस्त आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.