Transport Bike by Train: ट्रेनने बाईक पाठवायची आहे ? काय असते प्रक्रिया ? कोण-कोणती कागदपत्रे लागतात, हे पाहूयात…

जर तुम्ही तुमची बाईक एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी ट्रेनद्वारे पाठवू इच्छीत असाल तर त्यासाठी कोणती प्रक्रिया असते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Transport Bike by Train: ट्रेनने बाईक पाठवायची आहे ? काय असते प्रक्रिया ? कोण-कोणती कागदपत्रे लागतात, हे पाहूयात...
Transport Bike by Train
| Updated on: May 17, 2026 | 5:54 PM

जर तुम्ही दुसरीकडे कुठे रहायला गेला आणि ट्रेनने जर तुम्हाला तुमची बाईक पाठवायची असेल तर काय प्रक्रिया करावी लागते हे पाहूयात..अनेकांना ट्रेनने एखादी वस्तू पार्सल पाठवणे हे अवघड आणि जास्त खर्चाचे आहे असे वाटत असते. रेल्वेतून बाईक पाठवण्यासाठी काही कागदपत्रे, पॅकींग आणि बुकींगची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. चला तर ट्रेनने मोटर सायकल पाठवण्याची काय प्रक्रिया असते.

काय करावे लागेल ?

ज्या स्थानकातून बाईक पाठवायची आहे त्या स्थानकावर जावे लागेल. मात्र, तेथे पार्सल बुकींगची सुविधा उपलब्ध असायला हवी. तेथे पार्सल बुकिंग ऑफीसातून बाईक पाठवण्याचा अर्ज घ्यावा लागेल. यात बाईक मालकाची माहिती, गंतव्य स्थानक, मोबाईल क्रमांक आणि बाईकशी संबंधित माहिती भरावी लागेल. यानंतर बाईकची तपासणी आणि वजन केले जाते. अंतर आणि वजनाच्या हिशेबाने चार्ज निश्चित केला जातो. पैसे भरल्यानंतर रेल्वे रिसिट देते, तिला सांभाळून ठेवणे गरजेचे असते.

कोणती कागदपत्रे गरजेची असतात ?

जेव्हा तुम्ही तुमची बाईक पाठवता तेव्हा तुमच्या जवळ आधारकार्ड, बाईकची आसी बुक, वैध इन्शुरन्स, एक्टीव्ह मोबाईल नंबर असणे गरजेचे असते. जर बाईक कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असेल तर केवळ फोटो कॉपीने काम चालणार नाही. अनेक प्रकरणात ऑरिजन डॉक्युमेंट वा अधिकृत परवानगीची गरज असते.

बाईक पाठवण्याआधी काय तयारी करावी ?

रेल्वेच्या नियमांनुसार बाईक पाठवण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्यावा लागतील. या वेळी बाईकमधील पेट्रोल जवळपास रिकामे करावे लागेल. त्यामुळे आधीच पेट्रोलची टाकी संपवावी. तसेच साईट मिरर काढणे चांगले राहिल. बाईकला पाठवण्याआधी पॅकींग करावी लागेल. जी तुम्ही स्वत:ही करु शकता किंवा स्टेशन वेंडर कडूनही करु शकता. यात हँडल आणि बॉडीला सुरक्षित पॅकींग करावी लागेल.

पॅकिंगसाठी किती खर्च येतो ?

जर स्टेशनवरील पॅकींग एजन्सी बाईक पॅक करतात. सर्वसाधारणपणे पॅकींगचा खर्च ३०० ते ६०० रुपयांपर्यंत असते. हा खर्च बाईकचा आकार आणि पॅकींग क्वालिटीवर अवलंबून असते.

किती लागते भाडे ?

रेल्वे बाईक पाठवण्याचे भाडे अंतर आणि बाईकच्या वजनाच्या आधारे निश्चित होते. उदाहरणार्थ सुमारे ८०० किलोमीटरपर्यंत अंतरापर्यंत बाईक पाठवण्याचा एकूण खर्च सुमारे ३ हजारापर्यंत पोहचू शकतो. यात पार्सल चार्ज, पॅकींग आणि अन्य शुल्क सामील असू शकतात. याशिवाय ट्रेन एक्सप्रेस आहे की दुसऱ्या कोणत्या दर्जाची यावर देखील भाडे निश्चित होते.

बाईकचे पार्सल कसे ताब्यात घ्यायचे ?

ज्या स्थानकावर बाईक पोहचवली जाते, तेथे तिला वेळेत ताब्यात घेणे गरजेचे असते. रेल्वेची पावती दाखवून बाईक डिलीव्हरी केली जाते. जर बाईक स्थानकावर सहा दिवसांहून जास्त काळ राहिली तर अतिरिक्त चार्ज भरावा लागू शकतो. या वेळी ऑरिजनल पावती दाखवणे बंधनकारक आहे. एक तर स्टेशन बुक केल्यानंतर पावती पोस्ट करावी वा तुम्ही स्वत: ती घेऊन जावी. अनेक लोक विचार करतात की ज्या ट्रेनने प्रवास करत आहेत त्याच ट्रेन बाईक पाठवावी. परंतू, अनेकदा जागा नसल्याने बाईक दुसऱ्या ट्रेन देखील पाठवली जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या ट्रेनने बाईकही जाईल याची कोणतीही गॅरंटी नसते.

विम्याची गरज का ?

बाईक पाठवण्यादरम्यान वैध विमा असणे गरजेचा मानला जातो. फर्स्ट पार्टी इंन्शोरन्स असल्यास कोणतेही नुकसान वादाच्या स्थितीत मदत मिळू शकते. इन्शुरन्स फर्स्ट पार्टी असणेही गरजेचे असते.

Follow Us