Bad Cholesterol : दिसायला फिट असूनही LDL-C वाढू शकतं; जाणून घ्या कोलेस्ट्रॉलबाबत ही महत्त्वाची गोष्ट, असे करा चेक
उच्च LDL-C अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं दाखवत नाही, त्यामुळे स्वतःला फिट वाटत असलं तरी कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणं महत्त्वाचं ठरतं. तुमचं LDL-C किती आहे आणि तुमच्यासाठी योग्य लक्ष्य काय असू शकतं, हे डॉक्टरांच्या सल्ल्याने समजून घ्या.

भारतातील बहुतेक व्यक्तींना त्यांच्या कोलेस्ट्रॉलबाबत संपूर्ण माहित नसते , पण फार कमी व्यक्तींना त्यांचे वैयक्तिक एलडीएल-सी नेमकं काय असतं ते माहिती आहे.हृदयाच्या आरोग्यासंदर्भात केअर घेण्याची एकच पद्धत सर्वांना लागू होऊ शकत नाही, याबाबत कार्डिओलॉजिस्ट स्पष्ट करत आहेत.
एलडीएल-सीचे स्वरूप
उच्च एलडीएल-सीला अनेकदा “सायलेंट किलर” म्हटले जाते, कारण कोणतीही दृश्य लक्षणे न दाखवता ते हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर (प्लाक) जमा करण्याचे काम करते. या स्थितीला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे महत्त्वाच्या अवयवांकडे होणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका वाढतो. तरुण असणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे किंवा वजन नियंत्रणात असणे म्हणजे एलडीएल-सी अपेक्षित मर्यादेत आहे असे नाही.
एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी वैयक्तिक उद्दिष्टे
एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी लहान वयात तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) वयाच्या १८व्या वर्षापासून लिपिड प्रोफाइल तपासणी करण्याचा सल्ला देते. वेळेत केलेल्या तपासणीमुळे समस्या गंभीर होण्यापूर्वी शोधण्यात मदत होते. आरोग्यदायी दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील उच्च एलडीएल-सी असू शकते, त्यामुळे नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
लवकर निदान म्हणजे केवळ आकडेवारी तपासणे नाही. एलडीएल-सीचे लक्ष्य प्रत्येकासाठी वेगळे असते आणि सर्वांसाठी केअर घेण्याची एकच पद्धत लागू होत नाही. प्रत्येक व्यक्तीचे वय, कौटुंबिक इतिहास आणि मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखे इतर आजार यांसारखे स्वतंत्र जोखीम घटक असतात, ज्यावरून एलडीएल-सी पातळी निश्चित होते. एलडीएल-सी पातळी मर्यादेत राखणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे, आपल्या आरोग्याच्या स्थितीबाबत माहित असणे आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणाच्या प्रवासात स्वतः केअर करणे गरजेचे आहे.”
हृदयाच्या आरोग्याची स्वत:हून अशी घ्या काळजी
1. आज माझी एलडीएल-सी पातळी किती आहे?
2. माझे वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य काय असले पाहिजे?
3. माझ्या उद्दिष्टानुसार पातळी मर्यादेत आहे का, आणि नसल्यास, माझ्यासाठी कोणते पर्याय आहेत?
संतुलित आहार, तणाव नियंत्रण आणि नियमित व्यायाम यांसारखे जीवनशैलीतील बदल हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तरीही एलडीएल-सी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ जीवनशैलीतील हे बदल पुरेसे ठरतील असे नाही. अशा वेळी लिपिड कमी करणारे औषधोपचार आवश्यक ठरतात आणि दीर्घकाळापर्यंत या औषधोपचाराचे पालन करणे आवश्यक आहे.