AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : सिनेमात फक्त VFX, पौराणिक कथा पैशानं…’रामायण’ बद्दल ‘महाभारत’ फेम अभिनेत्याचं परखड मत

Gajendra Chauhan On Ramayana : 'रामायण' सिनेमाबद्दल अभिनेते गजेंद्र चौहान यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. पौराणिक कथा पैशांनी बनत नाही, असं ते म्हणाले.

Ramayana : सिनेमात फक्त VFX, पौराणिक कथा पैशानं...'रामायण' बद्दल 'महाभारत' फेम अभिनेत्याचं परखड मत
| Updated on: Nov 16, 2026 | 5:07 PM
Share

‘महाभारत’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध असलेले अभिनेते आणि एफटीआयआयचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी ‘रामायण’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘रामायण’ या शब्दाच्या वापराला आक्षेप घेणाऱ्या पहिल्या काही लोकांमध्ये आपला समावेश होता, असं ते म्हणाले.

काय म्हणाले गजेंद्र चौहान?

आयएएनएसशी बोलताना, अभिनेत्यानं ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांना भारताचा वारसा म्हटलं आहे. ही महाकाव्ये देशाची संस्कृती आणि सभ्यता दर्शवतात आणि भावी पिढ्यांना मूल्यं शिकवतात, असं ते म्हणाले.’आजकाल सोशल मीडियावर ‘रामायण’ चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. निर्माते आणि दिग्दर्शक त्याला ‘रामायण’ म्हणतात. ‘रामायण’ हा केवळ एक शब्द नाही; ते खरोखरच रामायण आहे. रामायण आणि महाभारत हा आपला वारसा आहे, आणि आम्हा सर्वांना आपल्या ग्रंथांचा खूप अभिमान आहे, कारण ते आपल्या देशाची संस्कृती आणि सभ्यता शिकवतात. आपल्या भावी पिढ्यांना काय सांगायला हवं, हे ते शिकवतात.’

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रियांवरही अभिनेत्यानं आपलं मत मांडलं. ते म्हणाले, ‘आज चर्चेचा विषय आहे की, ‘रामायण’ चित्रपट कसा आहे, आणि ज्यांनी तो पाहिला आहे त्या प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. काही जण म्हणतात की, तो चांगला आहे, काही जण म्हणतात की, तो वाईट आहे आणि लोक आपापली मतं मांडत आहेत. आमच्या इंडस्ट्रीतील कलाकारांनीही त्यावर भाष्य केलं आहे. त्यांच्या मते, चित्रपटात अध्यात्माची कमतरता आहे. तो मोठा सिनेमा आहे, पण ते फक्त व्हीएफएक्स आहे. कोणतीही पौराणिक कथा पैशानं बनवली जात नाही.’

गजेंद्र पुढे म्हणाले की, ‘पौराणिक कथा कलाकारांच्या प्रतिभेनं तयार होतात आणि मुख्य घटक हा आहे की अभिनेता ती भूमिका निभावण्यास सक्षम आहे की नाही. मला आठवतंय, महाभारतासाठी कलाकारांची निवड करताना बी. आर. चोप्रा म्हणाले होते की, जो राजासारखा दिसेल त्यालाच घ्यावं. कोणत्याही अभिनेत्यासाठी पहिली अट ही असते की, तो भूमिकेसाठी पात्र आहे की नाही. त्याची प्रतिमा भूमिकेशी जुळते की नाही.’

दरम्यान, गजेंद्र चौहान यांनी यापूर्वी ‘आदिपुरुष’ चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, तिकीट खरेदी करूनही त्यांनी तो चित्रपट पाहिला नव्हता. ‘हा चित्रपट कधीच प्रदर्शित व्हायला नको होता. संपूर्ण चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. सरकारने त्यावर तात्काळ बंदी घालावी.’ असं ते म्हणालेले.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर