महिलांनो, हार्मोनल बॅलेन्ससाठी रोज करा ही २ योगासनं; पाहा योग्य पद्धत आणि फायदे

Yoga for Women: महिलांच्या आरोग्यासाठी हार्मोनल बॅलेन्स राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी नियमित योगासने केल्याने तणाव कमी होण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. महिलांनी हार्मोनल बॅलेन्ससाठी रोज कोणती २ योगासने करावीत, जाणून घ्या.

महिलांनो, हार्मोनल बॅलेन्ससाठी रोज करा ही २ योगासनं; पाहा योग्य पद्धत आणि फायदे
Yoga
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 14, 2026 | 12:31 PM

धावपळीची जीवनशैली, अपुरी झोप, वाढता तणाव आणि बदलत्या डेली रूटीनचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत असतो. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास मासिक पाळीतील अनियमितता, मूडमध्ये बदल आणि थकवा यांसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी संतुलित आहार घेण्यासोबतच नियमित व्यायाम आणि योगासने करणे आवश्यक आहे. योगासन तुमचा तणाव कमी करण्यासोबतच एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. महिलांनी आपल्या दैनंदिन दिनचर्येत काही सोप्या योगासनांचा समावेश केल्यास शरीराची लवचिकता वाढवण्यासही मदत मिळू शकते. हार्मोनल बॅलेन्स आणि महिलांचे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी महिलांनी रोज नियमित २ योगासने केली पाहिजे. ही योगासने कोणती, ती कशी करावी आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घ्या.

मलासन

हे महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकणारे योगासन आहे. या आसनामुळे हिप्स आणि पेल्विक भागातील लवचिकता वाढण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा. आता दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. त्यानंतर हळूहळू गुडघे वाकवून खाली बसा. शक्य असल्यास दोन्ही टाचा जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात छातीसमोर नमस्काराच्या मुद्रेत जोडून पाठ सरळ ठेवा. या स्थितीत सामान्यपणे श्वास घेत ३० सेकंद ते एक मिनिट थांबा. त्यानंतर हळूहळू पूर्व स्थितीत या. नियमित सरावामुळे शरीराच्या खालच्या भागाची लवचिकता सुधारण्यास मदत होऊ शकते.

Loading...

उष्ट्रासन

उष्ट्रासन हे शरीराच्या पुढील भागाला ताण देणारे योगासन आहे. हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर गुडघ्यांवर बसावे. गुडघ्यांमध्ये हिप्सच्या रुंदीइतके अंतर ठेवा. त्यानंतर हळूहळू शरीर मागच्या दिशेने वाकवून दोन्ही हातांनी टाचा पकडण्याचा प्रयत्न करा. छाती वरच्या दिशेने उचलावी आणि खांदे मागे घ्या. या स्थितीत मानेला जास्त ताण देऊ नका. सुरुवातीला १५ ते ३० सेकंद या स्थितीत राहून सामान्य श्वास घ्या. त्यानंतर सावकाश पूर्व स्थितीत या. या आसनामुळे छाती आणि शरीराच्या पुढील भागाला ताण मिळतो. तसेच शरीराची ठेवण सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us